ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सोलापुरात रविवारी 1479 जणांना कोरोना ; 24 जणांचा मृत्यू - corona patient deaths in Solapur

कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी प्रशासन आटोकाट प्रयत्न करत आहे. सद्यस्थितीत राज्य सरकारने दिलेल्या नियमाप्रमाणे सोलापुरात कडक लॉकडाऊन सुरू आहे. पण कोरोनाचे थैमान सुरूच आहे.

Solapur Corona update
सोलापूर कोरोना अपडेट
author img

By

Published : Apr 18, 2021, 11:21 PM IST

सोलापूर-शहर व जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रविवारी शहर आणि जिल्ह्यातील 1479 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. शहरात 257 जण कोरोना पॉजीटिव्ह आले आहेत. तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 1, 222 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

सोलापुरात स्थानिक प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी प्रशासन आटोकाट प्रयत्न करत आहे. सद्यस्थितीत राज्य सरकारने दिलेल्या नियमाप्रमाणे सोलापुरात कडक लॉकडाऊन सुरू आहे. पण कोरोनाचे थैमान सुरूच आहे. रविवारी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 24 कोरोनाबधितांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा-अमरावतीत कोरोनाबाधितांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी ४ तास वेटिंग; 'हे' आहे कारण

जिल्ह्यात 1222 जणांना कोरोनाची लागण-
सोलापुरातील ग्रामीण भागात 1,222 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 723 पुरुष तर 499 स्त्रियांना कोरोनाची लागण झाली आहे. माढा, माळशिरस, मोहोळ, पंढरपूर, बार्शी या भागात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागातील 19 कोरोनाबधितांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये 14 पुरुष आणि 5 स्त्रियांचा समावेश आहे.

हेही वाचा-'साठेबाजाला वाचवण्यासाठी भाजपा नेते जातात, याचा अर्थ काहीतरी काळेबेरे आहे'

शहरात 257 जणांना कोरोनाची लागण
सोलापूर शहरात 257 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 166 पुरुष आणि 91 स्त्रियांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरात 5 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये 3 पुरुष तर 2 स्त्रिया आहेत. दिलासादायक बाब म्हणजे शहरात 300 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details