सोलापूर- सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवारांच्या समर्थनार्थ सोलापुरातील चार हुतात्मा चौक येथे निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. अजित पवार व शरद पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. ही सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केला जात आहे. याचा निषेध करत राज्यभर राष्ट्रवादी काँगेस पक्षाकडून संताप व्यक्त केला जात आहे.
राजकीय द्वेषापोटी छापेमारी
ईडी आणि आयकर विभाग हे देशातील स्वायत्त संस्था आहेत. काम करण्यासाठी ईडी (सक्तवसुली संचालनालय) आणि आयकर विभागाला काही अधिकार देण्यात आले आहेत. मात्र, या संस्थांचा दुरुपयोग करून केंद्र सरकार राजकीय द्वेषापोटी पवार कुटुंबियांच्या नातेवाईकांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी सुरू केली आहे.