महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 18, 2022, 3:24 PM IST

Updated : Jul 18, 2022, 4:16 PM IST

ETV Bharat / city

NCP Agitation Solapur : खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन; प्रशासनाला दिला इशारा

सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. महापालिकेकडून खड्डे बुजविण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या या मागणीसाठी शहर राष्ट्रवादी ( NCP Agitation Solapur ) अर्बन सेल व व्यसनमुक्ती सेलच्या वतीने मरीआई चौक येथे खड्यात झाड लावून व प्रतिकात्मक अपघाताचे आंदोलन करण्यात आले.

सोलापूर आंदोलन
सोलापूर आंदोलन

सोलापूर -शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे सोलापूर शहरात सर्वत्र रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अनेक भागातील रस्ते चिखलमय झाले आहे. सोलापूरकराना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक गाड्यांचा अपघात देखील होत आहेत. महापालिकेच्या वतीने खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली असून खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. परंतु अजूनही शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. महापालिकेकडून खड्डे बुजविण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या या मागणीसाठी शहर राष्ट्रवादी ( NCP Agitation Solapur ) अर्बन सेल व व्यसनमुक्ती सेलच्या वतीने मरीआई चौक येथे खड्यात झाड लावून व प्रतिकात्मक अपघाताचे आंदोलन करण्यात आले.

प्रतिक्रिया देताना आंदोलक

'अन्यथा महानगरपालिकेवर मोर्चा काढू' :सोलापूर महापालिकेवर भाजपाची सत्ता होती. त्यामुळे शहराचे कोणतेही काम व्यवस्थित झाले नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष भारत जाधव यांनी केला. स्मार्ट सिटीच्या नावावर शहरात कोणतेही काम चांगले झाले नाही. त्यामुळे शहरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. शहरातील सर्व खड्डे लवकरात लवकर बुजवावे अन्यथा महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा शहराध्यक्ष भारत जाधव यांनी दिला. मरीआई चौकात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून ते त्वरित बुजवावे, अशी मागणी राष्ट्रवादी अर्बन सेलचे चंद्रकांत पवार यांनी केली आहे.

प्रतिकात्मक अपघात आंदोलन :राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील खड्ड्यांविरोधात अनोखे आंदोलन केले. एका कार्यकर्त्याने स्वतःला अपघातात जखमी झाल्याचे प्रतिकात्मक दाखवले. हाताला सलाईन लावून संपूर्ण शरीराला बँडेज पट्ट्या बांधून आंदोलन केले. सोलापूर शहरातील खड्ड्यांमुळे नागरिकांची अशी अवस्था होत असल्याचा संदेश या आंदोलनातून दिला.

हेही वाचा -Video : वैचारिक मतभेद असतील, पण आदिवासी महिलेला पाठिंबा- आदित्य ठाकरे

Last Updated : Jul 18, 2022, 4:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details