महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

April Fool Agitation in Solapur : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लक्षवेधी "एप्रिल फुल" आंदोलन; वाटली कमळाची फुले

महागाई कमी करण्यासाठी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसत नाही. महागाई आणि बेरोजगारी कमी करण्याचे आश्वासन देऊन कमळाच्या साक्षीने सत्तेवर आलेल्या मोदी सरकारचा सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने प्रतिकात्मक स्वरुपात जनतेला कमळाची फुले वाटप करून " एप्रिल फुल " करत ( April Fools Agitation in Solapur ) तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेला निषेधाचा केक कापून अगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध नोंदविण्यात आला.

April Fools Agitation in Solapur
राष्ट्रवादीचे एप्रिल फुल आंदोलन

By

Published : Apr 1, 2022, 12:46 PM IST

लापूर -महागाईने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. अनेकांना प्रपंच चालविणे मुश्किल बनले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगणाला भिडत आहेत. डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर आहे तर पेट्रोलने शंभरी पार केली आहे. एकूणच जनता जगण्या-मरण्याचा संघर्ष करत असताना महागाई कमी करण्यासाठी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसत नाही. महागाई आणि बेरोजगारी कमी करण्याचे आश्वासन देऊन कमळाच्या साक्षीने सत्तेवर आलेल्या मोदी सरकारचा सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने प्रतिकात्मक स्वरुपात जनतेला कमळाची फुले वाटप करून " एप्रिल फुल " करत ( April Fools Agitation in Solapur ) तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेला निषेधाचा केक कापून अगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध नोंदविण्यात आला.

प्रतिक्रिया

घोषणाबाजीने पेट्रोल पंप दणाणला - राष्ट्रवादी युवकचे सोलापूर शहराध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी अक्कलकोट रोडवरील पेट्रोल पंपावर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहधारकांना कमळाचे प्रतिकात्मक फुल देऊन निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. एक हि भूल, कमल का फुल, महागाई कमी करण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारचा धिक्कार असो, देशाचे वाटोळे करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो, पेट्रोल शंभरी पार, मोदी सरकार खुशाल यार, सामान्य जनतेला बेकारीच्या खाईत लोटणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणांनी पेट्रोल पंप परिसर दणाणून गेला होता.

राष्ट्रवादीचे एप्रिल फुल आंदोलन


कोरोना हद्दपार होताना महागाईचे चटके -देशभरातील नागरिक अगोदरच कोरोनाच्या संकटात होरपळून गेले आहेत. तब्बल दोन वर्षे सामान्य जनतेने महागाईचे चटके सहन केले. आता कुठे कोरोना हद्दपार होऊन सर्वकाही सुरळीत होईल असे वाटत असतानाच पुन्हा महागाईने तोंड वर काढले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगणाला भिडल्यामुळे जनतेला सर्वाधिक फटका बसत आहे. महागाईमुळे महिलांचे किचन बजेट कोलमडून पडले आहे. इंधन दरवाढ नकोशी झाली आहे. वाहन घेऊन घराबाहेर पडणे नागरिकांना मुश्किल बनले आहे. कमळ फुलाच्या साक्षीने देशात सत्तेत आलेले मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले असल्याचा आरोप करत नागरिकांना कमळ फुल देऊन एप्रिल फुल करत महागाईचा निषेध करण्यात आला.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित -यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, अहमद मासुलदार, आशिष बसवंती, मुसा अत्तार, प्रशांत फाळके, विक्रांत खुणे, महेश पवार, कृणाल वाघमारे, हुसेन शहानुरकर, मुझफ्फर बागवान, जहीर गोलंदाज, सर्फराज बागवान, सादिक कुरेशी, विश्वनाथ बिडवे, मोहसीन मुजावर, शुभम शितोळे, रियाज अत्तार, इरफान शेख, विवेक फुटाणे, इरफान शेख, याहीया कांबले, अबादिराजे बागवान, फारुख शेख, इमाम सय्यद, लखन चव्हाण, सनी पवार, सोहेल पटेल, रमीज मुल्ला, सादिक शेख, अमोल उपाडे, गौस मोहोळकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा -Road Accident in Poonch : पूंछ भागात कार कोसळली दरीत; भीषण अपघातात 9 जण ठार

ABOUT THE AUTHOR

...view details