महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nag Panchami: सापाचा दूध पिल्याने मृत्यू होतो - सर्प अभ्यासक राहुल शिंदे - happy nag panchami 2021

नागपंचमीच्या वेदकालीन अनेक प्रथा, आख्यायिका सांगितल्या जातात. त्यापैकी एक कथा म्हणजे सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वरचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला होता. भावाच्या शोकात सत्येश्वरी देवीने अन्न ग्रहण केले नव्हते. सत्येश्वरी या कनिष्ठ देवीला तिचा भाऊ नागाच्या स्वरूपात दिसून आला होता. त्यावेळी तिने नागरूपाला आपला भाऊ मानले होते.

nag panchami 2021 news
Nag Panchami: सापाचा दूध पिल्याने मृत्यू होतो - सर्प अभ्यासक राहुल शिंदे

By

Published : Aug 13, 2021, 8:31 AM IST

सोलापूर -श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नागाबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. पण प्रत्यक्षात नागाची पूजा करणे म्हणजे त्याचा छळ करण्यासारखे आहे. सापाला किंवा नागाला दूध पाजणे हे त्याच्या शरीरावर अत्याचार करण्यासारखे आहे. कारण दुधात लॅक्टिक अ‌ॅसिड असते, ज्यामुळे सापाच्या शरीरात भयंकर प्रक्रिया होऊन त्याला निमोनिया हा आजार होतो आणि त्यातच त्याचा मृत्यू होतो. साप किंवा नाग हा सरपटणारा जीव फक्त पाणी पितो दूध पीत नाही. असे मत सर्पमित्र, सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

सापाचा दूध पिल्याने मृत्यू होतो - सर्प अभ्यासक राहुल शिंदे
  • नागपंचमी प्रथा -

नागपंचमीच्या वेदकालीन अनेक प्रथा, आख्यायिका सांगितल्या जातात. त्यापैकी एक कथा म्हणजे सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वरचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला होता. भावाच्या शोकात सत्येश्वरी देवीने अन्न ग्रहण केले नव्हते. सत्येश्वरी या कनिष्ठ देवीला तिचा भाऊ नागाच्या स्वरूपात दिसून आला होता. त्यावेळी तिने नागरूपाला आपले भाऊ मानले होते. त्यावेळी नागदेवाने सत्येश्वरीला वचन दिले होते की, जी स्त्री किंवा बहिण नागपंचमीला माझी पूजा करेल त्याचे रक्षण मी करेन. त्यामुळे नागपंचमीला नागाच्या प्रतिमेची पूजा केली जाते. हळूहळू ही परंपरा समाजात रूढ होत गेली आणि अनेक वर्षांपासून नागाची प्रत्यक्षात पूजा केली जात आहे.

  • नागपंचमी सणाला गारुड्यांचा काळा धंदा -

दरवर्षी अनेक शहरात नागपंचमीला गारुड्यांचा काळा धंदा पहावयास मिळतो. नागपंचमी सणाला हे गारुडी नागाला शहरात आणून नागाला दूध पाजा आणि पुण्य प्राप्त करा असे सांगत पैसे उकळतात. पण सापाला किंवा नागाला दूध पाजणे हे त्याच्या शरीरावर अत्याचार करण्यासारखे आहे. कारण दुधात लॅक्टिक ऍसिड असते, ज्यामुळे सापाच्या शरीरात भयंकर असे आजार निर्माण होऊन त्याला निमोनिया हा आजार होतो आणि त्यातच त्याचा मृत्यू होतो. साप किंवा नाग हा सरपटणारा जीव फक्त पाणी पितो दूध पीत नाही. गारुडी सापाला किंवा नागाला पकडून त्याला पाणी पाजत नाही, दोन ते तीन दिवस त्याची तहान भागवली जात नाही. आणि नागपंचमीला हे गारुडी नागरिकांना भूल थापा मारत त्यासमोर दूध ठेवतात आणि पाणी समजून नाग दूध पितो. नागपंचमीला नाग देवताची पूजा करण्याऐवजी त्याला मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. वन विभाग आणि सर्पमित्रांच्या जनजागृतीमुळे आणि कडक कायद्यामुळे आता गारुड्यांची संख्या कमी होत चालली आहे. असे सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांनी सांगितले.

  • नागपंचमीला प्रत्यक्ष नागाची पूजा करणे म्हणजे त्याचा छळ करणे -

नागपंचमीला नागाची पूजा करणे किंवा त्याला दूध पाजणे म्हणजे त्यावर अत्याचार किंवा त्याचा छळ करणे आहे, असे मत वन विभागाने आणि सर्पमित्रांनी वेळोवेळी जनजागृती द्वारे नागरिकांना माहिती करून दिले आहे. पण आजही ग्रामीण भागात किंवा शहरी भागातील स्त्रिया नागपंचमीला नागाची प्रत्यक्ष पूजा करण्यात अधिक श्रद्धा समजतात. नागासमोर पुंगी वाजवणे, त्यासमोर आरती करणे, त्याला नैवेद्य दाखवणे म्हणजे त्याचे मानसिक संतुलन बिघडवणे आहे. आणि त्याचा छळ करणे आहे, असे अनेकवेळा सर्प मित्रांनी आणि प्राणी मित्रांनी व वन विभागाने पुराव्यासाहित जनजागृती करून स्पष्ट केले आहे. तरीदेखील भारतीय समाजात आज सुद्धा नागाची प्रत्यक्ष पूजा करण्यात अधिक श्रद्धा मानली जाते पण हे अत्यंत चुकीचे असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

  • साप हा शेतीपूरक जीव; पण विषारी सापांचा चावा जीवघेणा -

शेतीला त्रासदायक ठरणाऱ्या उंदीर, घुशीसारख्या छुप्या शत्रूंचा नायनाट करण्याचं पारंपरिक काम सर्पजगत करत असते. सापाचा चावा म्हणजे मृत्यू हा गैरसमज पिढ्यान्पिढ्या पक्का झाला आहे. म्हणून सर्व साप विषारी समजले जातात. आपल्याकडे आढळणाऱ्या प्रमुख चार विषारी जातींच्या सापापैकी भारतीय चष्मेवाला नाग अर्थात इंडियन कोब्रा, मण्यार(इंडियन क्रेट) या दोन्ही सापाच विष न्यूरोटॉक्सिक म्हणजे शरीराच्या मज्जासंस्थेवर परिणाम करतो. घोणस (रसेल्स वायपर), आणि फुरस (सोस्केल्ड वायपर) या दोन्ही सापांचे विष हेमोटॉक्सिक म्हणजे रक्तावर परिणाम करणारे समजले जाते. घोणस व फुरसे साप चावल्यावर शरीरात अंतर्गत रक्तस्राव सुरू होतो. नाग अथवा मण्यार चावल्यावर मज्जासंस्थेवर परिणाम होऊन शरीराचा ताबा जातो. बिनविषारी साप चावल्यावर व्यक्ती मरत नाही, असे शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा -नागपंचमीवर कोरोनाचे सावट, शिराळा नगरीवर ड्रोनची असणार नजर

ABOUT THE AUTHOR

...view details