सोलापूर -पत्नी व मुलगा वीटभट्टीवर मजुरीला येत नसल्याच्या रागातून वीटभट्टी चालकाने एकामजुराचा डोक्यात फावड्याने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जगन्नाथ कुंभार असे वीटभट्टी मालकाचे नाव असून विठ्ठल सोलापूरे (वय 45 रा.ताई चौक, स्वागत नगर, सोलापूर) असे मृत मजुराचे नाव आहे. तो गाडीवर चालकाचे काम करत होता. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मृताची पत्नी रेणुका विठ्ठल सोलापूरे (वय 38) यांनी फिर्याद दाखल केली आहे. वीटभट्टी चालक जगन्नाथ कुंभार याला पोलिसांनी अटक केली असून त्याची दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
माहिती देताना पोलीस अधिकारी मृताची पत्नी व मुलगा कामावर गेले नव्हते - मृत विठ्ठल सोलापूरे यांची पत्नी रेणुका व त्यांचा मुलगा जगन्नाथ कुंभार यांच्या वीटभट्टीवर कामास होते. मृत विठ्ठल सोलापूरे हे श्रीशैल केंगनाळकर यांच्या वीटभट्टीवर टेम्पो ड्रायव्हर म्हणून कामास होते. परंतु रेणुका व त्यांचा मुलगा कामावर न गेल्याने वीटभट्टीवरील सर्व कामकाज बंदच होते. त्यामुळे संशयित आरोपी जगन्नाथ कुंभार हे मजूर रेणुका व तिच्या कुटुंबावर चिडून होते. 6 मार्च रोजी दुपारी जगन्नाथ कुंभार हे रेणुकाच्या घरी येऊन धमकी देऊन गेला होता.
हे ही वाचा - मुकेश अंबानी प्रकरण: राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून होणार तपास
मृताच्या पत्नीस बेंड झाल्याने कामावर गेली नाही -
रेणुका सोलापूरे हिच्या हाताला बेंड झाल्याने काम करता येत नव्हते. कारण वीटभट्टीवर काम करताना माती हाताने थापावी लागत होती आणि बेंडची जखम वाढत चालली होती. तसेच आई जात नसल्याने मुलाने देखील कामाला दांडी मारली होती. त्यामुळे वीटभट्टीवरील कामकाज गेल्या 7 ते 8 दिवसांपासून बंदच होते. 6 मार्च रोजी कुंभार याने रेणुकासोबत वाद घालून धमकी दिली होती. त्यावेळी रेणुका सोलापुरे यांनी मुलास कामावर पाठवते, असे सांगितले होते.
हे ही वाचा - महिला दिनी गिफ्ट: महिलांच्या नावे घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात मोठी सवलत
कामकाज बंद असल्याने फावड्याने घाव घातला -
अनेक दिवसांपासून वीटभट्टीचे कामकाज बंद होते. शेवटी वीटभट्टी चालक जगन्नाथ कुंभार हा 6 मार्च रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास रेणुकाच्या घरी आला.आणि मुलाला कामावर पाठवा असे जोरजोरात ओरडू लागला. आणि रेणुकाचा पती विठ्ठल सोबत वाद घालू लागला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. जगन्नाथ कुंभार याने रागाच्या भरात विठ्ठल सोलापूरे याच्या डोक्यात फावड्याने जबर वार केला. यामध्ये विठ्ठल हा जबर जखमी झाला. त्याला उपचारासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. पण उपचार सुरू असताना रविवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी ताबडतोब संशयित आरोपीला खुनाच्या गुन्ह्याखाली अटक केली आणि कोर्टात उभे केले. जिल्हा न्यायाधीशांनी संशयित आरोपीला दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे.
हे ही वाचा - महा अर्थसंकल्प २०२१ : रस्ते बांधकामासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा