सोलापूर - स्वातंत्र्यपूर्व काळातील शाळा पावसाच्या पाण्याने गळत असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थीसह शिक्षकांना अस्मानी संकटाला सामोरे जावे लागत आहे. सोलापूर शहर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. ही संततधार काही केल्या थांबण्याचे नाव घेते नाही. सोलापूरच्या इतिहासात प्रथमच अशा स्वरूपाचा पाऊस बरसत आहे. एककिडे कधी नव्हे ते वरूनराजा दुष्काळी सोलापूर भागात कृपादृष्टी ठेवत आहे. तर, दुसरीकडे वेगळेच चित्र शहरात दिसत आहे.
शिक्षण विभागात देखील खळबळ - सध्या पुनःवसू नक्षत्राच्या पावसाने महापलिका प्रशासनाची झोप उडवली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे महापालिकेच्या विविध विभागाचे कामकाज वाढले आहे. अशातच शिक्षण विभागात देखील खळबळ माजली आहे. महापलिका प्रशासनाच्या शाळा क्रमांक नऊची अवस्था दयनीय बनली आहे.
विद्यार्थी आणि शिक्षकावर अस्मानी व सुलतानी संकट -स्वातंत्र्यपूर्व काळातील शाळा पावसाच्या पाण्याने गळत आहेत. विद्यार्थीसह शिक्षक जिववावर उदार होऊन अध्ययन व अध्यापन करत असल्याचे विदारक चित्र सोलापुरात दिसत आहे. महापालिका प्रशासन याकडे सतत्याने दुर्लक्ष करीत असल्याने अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटात शाळा आणि विद्यार्थी शिक्षक अडकले आहेत. वरून पाऊस अन खालून प्रशासकीय मान्यतेच्या आडकाठ्या अशी दुहेरी कोंडी शिक्षकांसह विद्यार्थीसमोर उपस्थित झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शाळा दुरुस्ती करण्याचे पत्र मुख्यध्यापकांनी प्रशासनला वारंवार देऊनही यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.
जीव मुठीत धरून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत -ब्रिटिशकालीन ही इमारत कधी ढासळेल आणि अध्ययन व अध्यपान करणाऱ्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांना याची इजा सहन करावी लागेल याचा नेम नाही. महापालिकेच्या या शाळेतील सर्व वर्गखोल्याची हीच परिस्थिती असल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याचा परिणाम विद्यार्थी पटसंख्येवर झाला आहे.