सोलापूर - शहरात रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास भर चौकात मोठा अपघात झाला. मॉर्निंग वॉकला आलेल्या व्यक्तीचा रस्ता ओलांडतांना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या भीषण अपघातामध्ये मृताचा मेंदू रस्त्यावर पडला होता. सोनू पिचेलाल बगेल (वय 55, रा. निराळे वस्ती) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू - सोलापूर अपघात बातमी
भीषण अपघाता मृत झालेल्या बगेल यांचे मुंडके चेंदामेंदा झाले होते. मेंदू पूर्णतः रस्त्यावर पडला होता. पोलिसांनी अॅबुलन्स चालक जहाँगिर शेख (उर्फ लादेन) याला बोलावून मृतदेह उचलण्यास सांगितले. त्यावेळी रुग्णवाहिका चालकाने मृतदेह उचलताना रस्त्यावर पडलेला मेंदू देखील उचलून प्लास्टिक पिशवीमध्ये ठेवला.
![मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू morning walker died in collision with unknown vehicle in solapur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9045923-1091-9045923-1601805906952.jpg)
या अपघाताची नोंद सिव्हिल पोलीस चौकित झाली आहे. सोनू बगेल हे रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास मेकॅनिक चौक, नवी वेस पोलिस चौक येथे रस्ता ओलांडत होते. सकाळची वेळ असल्याने रस्ते सामसूम होते. अशा सामसूम रस्त्यावरून सोनू बगेल हे रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिल्याने ते चिरडले गेले. पोलीस नाईक एस. एस. चव्हाण यांनी त्यांना शासकीय रुग्णालयात उपचाराकरता दाखल केले असता, उपचारापूर्वीच सोनू बगेल यांचा मृत्यू झाल्याचे डॉ. खुशाल माळवदे यांनी सांगितले. याबाबत सिव्हिल पोलीस चौकित नोंद झाल्या नंतर पोलीस त्या अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.
हाताने मेंदू जमा करून ठेवले प्लास्टिक पिशवीत
सोनू बगेल हे मॉर्निंग वॉकला आल्या नंतर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये बगेल यांचा जाग्यावरच मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की, बगेल यांचे मुंडकं चेंदामेंदा झाला होता. मेंदू पूर्णतः रस्त्यावर पडले होते. पोलिसांनी अॅबुलन्स चालक जहाँगिर शेख (उर्फ लादेन) याला बोलावून मृतदेह उचलण्यास सांगितले. त्यावेळी रुग्णवाहिका चालकाने मृतदेह उचलताना रस्त्यावर पडलेले मेंदू देखील उचलून प्लास्टिक पिशवीमध्ये ठेवले.