सोलापूर- मध्यप्रदेशातील एका काँग्रेस आमदाराच्या सोलापुरातील तेल कारखाना आणि मालमत्तेवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. येथील चिंचोळी एमआयडीसीतील बैतुल ऑइलमिल या नावाने हा कारखाना सुरू आहे. ही कारवाई रविवारी मध्यरात्री सुरू झाली असून आतापर्यंत साडे सात कोटी रुपयांची रोखड जप्त करण्यात आली आहे. अजूनही कारवाई सुरू असल्याची माहिती सोलापूर आयकर विभागातील एका अधिकऱ्याने दिली. पुणे येथील आयकर विभागाच्या तपास पथकानेही कारवाई केली आहे. निलेश डागा असे त्या काँग्रेस आमदाराचे नाव असून कारवाई सुरू असल्याने अधिकाऱ्यांकडून अधिकची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदार निलय डागा यांची ऑइल मिल-
मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदार निलय डागा यांची बैतुल या नावाने चिंचोळी एमआयडीसी(सोलापूर)येथे ऑईल मिल आहे. गेल्या तीन दिवसांपासून काँग्रेस आमदार डागा यांच्या घराची आणि ऑईल मिलची झडती सुरू आहे. सोलापुरातील त्यांच्या घराची देखील झडती घेण्यात आली. डागा यांच्या मालकीचे शहरात अनेक कारखाने आहेत. यामाध्यमातून कर बुडवून आर्थिक गैर व्यवहार केला असल्याची माहिती पूणे येथील आयकर विभागातील तपास पथकाला मिळाली होती. जवळपास 100 कोटींची उलाढाल अंगडायीया(हवाला)च्या माध्यमातून केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.