महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भाजप नगरसेवक मटका किंग सुनील कामाठी फरारच; धंद्यात 83 एजंटांची नावे निष्पन्न - सोलापूर मटका जुगार न्यूज

शहरातील न्यू पाच्छा पेठेत 24 ऑगस्टला इमारतीत सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारला होता. या कारवाईमध्ये पोलिसांनी 22 आरोपींना अटक करून तेथील दोन लॅपटॉप, 48 मोबाईल फोन, लेखी डायऱ्या, 2 प्रिंटर, 5 मोटर सायकली, 181 हिशोबाचे रजिस्टर, आदींसह जुगाराचे साहित्य, असा मुद्देमाल जप्त केला होता. तसेच या कारवाई दरम्यान काही संशयित आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी परवेझ उर्फ बब्बू इनामदार याचा उडी मारून पळून जाताना मृत्यू झाला असल्याची नोंद जेलरोड पोलीस ठाण्यात झाली आहे.

Matka King Sunil Kamathi
भाजप नगरसेवक मटका किंग सुनील कामाठी

By

Published : Aug 29, 2020, 6:40 AM IST

सोलापूर- शहरातील मटका किंग सुनील कामाठीचा पोलिसांना अद्यापही माग सापडला नाही. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या धंद्यावरील सर्व कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे. तसेच त्याच्या घराची झडती घेतली असता, त्यावेळी सापडलेल्या कागदपत्रांवरून सोलापूर शहरातील 83 मटका एजंटांची नावे समोर आली आहेत. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शुक्रवारी याबाबतची माहिती दिली. तसेच आणखी काही आकडा बहाद्दर असलेल्या संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

मटका अड्ड्यावर करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 22 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये अखतर महंमद हनिफ, अफसर सय्यदहुसेन सय्यद, सलीम गफूर शेख, रवींद्र उर्फ बंडू मुसळे या एजंटांना अटक केले आहे.

शहरातील न्यू पाच्छा पेठेत 24 ऑगस्टला रोजी न्यू पाच्छा पेठ येथील इमारतीत सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारला होता. या कारवाईमध्ये पोलिसांनी 22 आरोपींना अटक करून तेथील दोन लॅपटॉप, 48 मोबाईल फोन, लेखी डायऱ्या, 2 प्रिंटर, 5 मोटर सायकली, 181 हिशोबाचे रजिस्टर, आदींसह जुगाराचे साहित्य, असा मुद्देमाल जप्त केला होता. तसेच या कारवाई दरम्यान काही संशयित आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी परवेझ उर्फ बब्बू इनामदार याचा उडी मारून पळून जाताना मृत्यू झाला असल्याची नोंद जेलरोड पोलीस ठाण्यात झाली आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपीचा शोध घेतला असता, भाजपाचा नगरसेवक सुनील कामाठी, पोलीस मुख्यालयातील पोलीस शिपाई स्टीफन नेल्सन स्वामी या दोघांच्या भागीदारीत हा अवैध मटका व्यवसाय असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी आणखी सखोल तपास करत सुनील कामाठी याच्या घरी जाऊन झडती घेतली. तसेच अटक करण्यात आलेला आरोपी आकाश राम कामाठी याची कसून चौकशी केली असता, पोलिसांनी 26 ऑगस्टला आकाश व सुनील कामाठी याच्या घरची तपासणी केली. त्या ठिकाणी पोलिसांना 43 हजार रुपये रोख रक्कम, बँक पासबुक, कोरे चेकबुक, स्टॅम्प पेपर आदी साहित्य जप्त केले. जप्त केलेल्या कागदपत्रांवरून आणखी 83 मटका एजंटांची नावे समोर आली आहेत.

आकाश कामाठी याने दिलेल्या माहितीवरून अखतर महंमद हनिफ, अफसर सय्यदहुसेन सय्यद, सलीम गफूर शेख,रवींद्र उर्फ बंडू मुसळे या मुख्य संशयित मटका एजंटांना गुन्हे शाखेच्या पोलिसानी अटक केले आहे. या प्रकरणात पोलीस आयुक्त अंकुश शिंदे स्वतः लक्ष देत असल्याने प्रकरणाची गंभीरता वाढत चालली आहे. त्यातच मुख्य मटका चालक सुनील कामाठी पोलिसांना हाती लागत नसल्याने पोलिसांची दमछाक होत आहे.

मुख्य आरोपी सुनील कामाठी फरारच

मटका किंग म्हणून ओळख निर्माण झालेला सुनील कामाठी अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही. गुन्हे शाखेची संपूर्ण टीम त्याचा शोध घेत आहे. पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा शोध सुरू आहे. मात्र, त्यांना देखील मटका किंग सापडत नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details