सोलापूर- फिट्स या आजारावर मांत्रिक पद्धतीने उपचार करण्याचा बहाणा करत भोंदू बाबाने एका तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याची खळबळजन घटना सोलापूर शहरात उघडकीस आली आहे. एवढेच नाही तर मांत्रिकाने केलेल्या अत्याचारातून पीडित तरुणीने एका बाळालाही जन्म दिला आहे. या प्रकरणी पीडितेने १० सप्टेंबरला सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, बलात्काराचा गुन्हा दाखल होताच तो भोंदू बाबा सोलापूर मधून फरार झाला असल्याची माहिती सदर बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी दिली आहे.
धक्कादायक..! आजार बरा करतो सांगून भोंदू बाबाचा तरुणीवर 3 वर्षांपासून बलात्कार; एका अपत्याचा जन्म
आजारावर मांत्रिक पद्धतीने उपचार करण्याच्या बहाण्याने एका तरुणीवर भोंदू बाबाने वारंवार बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या अत्याचारातून पीडितेने एका अपत्यास जन्मही दिला आहे. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
2015 साली पीडित तरुणीला मोठ्या प्रमाणात फिट्स येत होते. यावर तिच्या घरच्यांनी अनेक तज्ज्ञांची भेट घेऊन तिच्यावर उपचार केले. मात्र, तरुणीचा आजार बरा झाला नाही. त्याच दरम्यान एका व्यक्तीने त्यांना सोलापूर बसस्थानक परिसरात एक महाराज मांत्रिक पद्धतीने उपचार करत असल्याचे सांगितले आणि त्याच्याकडे त्या तरुणीला घेऊन जाण्याचा सल्ला दिला. तिथे गेल्यानंतर भोंदूबाबाने या मुलीला आपल्या जाळ्यात फसवण्यास सुरुवात केली. उपचाराच्या भूल थापामारून त्याने पीडितेला 2017 मध्ये कर्नाटक येथे नेले आणि त्या ठिकाणी गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर सन 2018 पासून त्या युवतीच्या घरच्यांना भूल थापा देत त्या युवतीला सोलापुरातील विडी घरकुल परिसरात उपचार करत असल्याचा बहाणा करत एकटे ठेवले आणि तिच्यावर सात्यत्याने बलात्कार केला. त्यामधून त्या अविवाहित युवतीने एका अपत्यास देखील जन्म दिला. शेवटी त्या युवतीने आपल्या मजबुरीस कंटाळून त्या भोंदू बाबा सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु भोंदू बाबाने लग्नाला विरोध करत लग्न करण्यास नकार दिला.
भोंदू बाबाच्या तावडीतून कसेबसे त्या युवतीने आपली सुटका करून गुरुवारी 10 सप्टेंबरला रात्री सदर बझार पोलीस ठाणे गाठले आणि सर्व हकीकत पोलिसांनी सांगितली. प्रकरणाची गंभीरता बघून पोलिसांनी भा. द. वि.376 प्रमाणे गुन्हा दाखल केला. मात्र तो पर्यंत आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.