महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

वीज बिल माफीच्या मुद्यावरून मनसे आक्रमक; सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा

जिल्ह्यातील मायक्रो फायनान्सचे कर्ज माफ करावे आणि लॉकडाऊन काळातील वाढीव वीज बिले माफ करावी, या मागणीसाठी मनसेच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

mns morcha
मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालवर मोर्चा

By

Published : Nov 21, 2020, 5:03 PM IST

Updated : Nov 21, 2020, 5:45 PM IST

सोलापूर- राज्यात सध्या लॉकडाऊन काळातील वाढीव वीजबिल कमी करण्याच्या मागणीवरून राजकारण तापू लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोलापुरात मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालवर मोर्चा काढण्यात येणार आहे. मनसेकडून प्रामुख्याने जिल्ह्यातील मायक्रो फायनान्सचे कर्ज माफ करावे आणि लॉकडाऊन काळातील वाढीव वीज बिले माफ करावी या मागणीसाठी बुधवारी 25 नोव्हेंबरला हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकरांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा

उपासमारीची वेळ-

धोत्रे म्हणाले, कोरोनामुळे सर्व लघु उद्योग बंद पडले आहेत. 72 दिवसांच्या कडक लॉकडाऊनमध्ये लोकांचे भरपूर हाल झाले. तर अनेक उद्योगांना टाळे ठोकावे लागले. तीन महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडली आहे. आर्थिक अडचणीमुळे लोक आत्महत्या करत आहेत. हाताला काम नाही, आणि उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, कुटुंब चालवण्यासाठी कसरत करावी लागत असताना लोकांनी कर्जे फेडायची कशी; त्यातच वाढीव लाईट बिलाचा भुरदंड कसा परवडणार, असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे बचत गटाचे कर्ज माफ करावे आणि लाईट बिल माफ करावे, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नांदगावकरांच्या नेतृत्वात मोर्चा-

वाढीव वीज बिलावरून मनसेच्या वतीने वारंवार सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे, या संदर्भात राज ठाकरे यांनी राज्यपाल आणि शरद पवारांनाही भेटले होते. मात्र, राज्य सरकारकडून बिलामध्ये सवलत देण्याच्या वक्तव्यावर घुमजाव करण्यात आले होते. त्यानंतर नांदगावकर यांनी दोन दिवासापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन राज्यभरात आंदोलनाचा इशारा दिला होता. आता सोलापूर शहरात बुधवारी निघणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व देखील बाळा नांदगावकर करणार आहेत. जिल्ह्यातील बचत गटाच्या कर्जदार महिला व वीज ग्राहक या मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली.

Last Updated : Nov 21, 2020, 5:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details