महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

BJP MLA Suspension Cancled : निलंबन रद्द झाल्यानंतर आमदार राम सातपुतेंचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले... - आमदार राम सातपुते निलंबन रद्द

उच्च न्यायालयाने भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांचे निलंब न ( BJP MLA Suspension Cancle ) रद्द केले आहे. यामध्ये माळशिरस मतदार संघाचे आमदार राम सातपुते ( MLA Ram Satpute Critisize MVA Government ) यांचाही समावेश होता. या निर्णयानंतर त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

Solapur
Solapur

By

Published : Jan 28, 2022, 9:52 PM IST

पंढरपूर -उच्च न्यायालयाने भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांचे निलंब न ( BJP MLA Suspension Cancle )रद्द केले आहे. यामध्ये माळशिरस मतदार संघाचे आमदार राम सातपुते ( MLA Ram Satpute Critisize MVA Government ) यांचाही समावेश होता. या निर्णयानंतर त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. मस्तवलेल्या सत्ताधार्‍यांना उच्च न्यायालयाने थोबाडलं असल्याची प्रतिक्रिया आमदार राम सातपुते यांनी दिली.

'मस्तावलेल्या सत्ताधार्‍यांना उच्च न्यायालयाने थोबाडलं' -

भाजप आमदार राम सातपुते यांचे ओबीसी आरक्षणावरून विधिमंडळात गदारोळ केल्याने अखेर निलंबन केले होते. त्याविरोधात भाजपने उच्च न्यायालयात धाव घेतली व त्यानंतर आज उच्च न्यायालयाने भाजप आमदारांचे निलंबन रद्द केले यातून भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. आमदार राम सातपुते यांनी ‘सत्यमेव जयते’ या शीर्षकाखाली ठाकरे व पवार यांनी सत्ताधाऱ्यांनी हुकूमशाही पद्धतीने आमचे निलंबन केले होते. उच्च न्यायालयाने निलंबन रद्द केले आहे. विधानसभा कुणाच्या बापाची जहागिरी नाही. आम्हाला मतदारांनी निवडून दिले आहे. मस्तावलेल्या सत्ताधार्‍यांना उच्च न्यायालयाने थोबाडलं असल्याची अशी जळजळीत टीका ट्विटरच्या माध्यमातून आमदार सातपुते यांनी केली.

हेही वाचा -महाआघाडी सरकार आतापर्यंत एकही केस कोर्टात जिंकले नाही, यापुढेही जिंकणार नाहीत - चंद्रकांत पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details