महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ramdas Athavale Solapur : 'संभाजीराजेंना धोका शिवसेनेने दिला, भाजपाने नव्हे' - संभाजीराजे राज्यसभा उमेदवारी प्रकरण

संभाजीराजे छत्रपती ( Sambhaji Raje Chhatrapati ) यांना शिवसेनेने ( Shivsena ) धोका दिला आहे, भाजपाने ( BJP ) नव्हे, असे स्पष्टीकरण केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले ( Union Minister of State Ramdas Athavale ) यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना माध्यमांना दिले आहे.

Ramdas Athavale
Ramdas Athavale

By

Published : May 31, 2022, 4:38 PM IST

Updated : May 31, 2022, 4:53 PM IST

सोलापूर - राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने अगोदर उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे भाजपाकडे आमदार जास्त असल्यामुळे शिवसेनेने तिसरा उमेदवार जाहीर केला आहे. संभाजीराजे छत्रपती ( Sambhaji Raje Chhatrapati ) यांना शिवसेनेने ( Shivsena ) धोका दिला आहे, भाजपाने ( BJP ) नव्हे, असे स्पष्टीकरण केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले ( Union Minister of State Ramdas Athavale ) यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना माध्यमांना दिले आहे. खर तर संभाजीराजे यांची भूमिका ही भाजपा विरोधी होती. ते नेहमी म्हणत होते, अपक्ष लढणार. तसेच भारतीय जनता पार्टीने धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. हे ताकदवान उमेदवार आहेत, त्यामुळे सहावी जागादेखील भाजपा जिंकणार, असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. सोलापूरच्या कृषी विज्ञान केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया देताना मंत्री रामदास आठवले

संभाजीराजेंची भूमिका नेहमी भाजपा विरोधी :राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करायची होती, तर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी उमेदवार द्यायला नको होता. संभाजीराजे यांनी भाजपासोबत राहायला हवे होते. मात्र, मागील काही दिवसांपासून संभाजीराजे यांच्या हालचाली या भाजपाविरोधी होत्या. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळालेली नसेल, असा अंदाज रामदास आठवले यांनी व्यक्त केला. संभाजीराजे छत्रपती अपक्ष उभे राहणार असेच ते कायम म्हणत होते. शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांना शब्द दिला होता असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेनेच धोका दिला आहे, भाजपाने नाही, असे रामदास आठवले म्हणाले.

हेही वाचा -Abdul Sattar on Supriya Sule : मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादीकडे सुप्रिया असतील तर आमच्याकडे रश्मी ठाकरे - राज्यमंत्री अब्दुल सत्तार

Last Updated : May 31, 2022, 4:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details