सोलापूर -औरंगाबादचे नामकरण करून संभाजीनगर करावे अशी मागणी तेथील स्थानिक नागरिकांनी केली आहे. त्यावर महाविकास आघाडीतील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देली आहे. सरकार शेवटी जनतेच्या भावनेचा विचार करते. संभाजीनगर हे तेथील स्थानिक नागरिकांच्या अस्मितेचा विषय आहे. जनतेला जे हवं आहे, सरकार त्यावर निर्णय घेईल, असे शिंदे म्हणाले.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, महापौर, सर्व तालुक्यातील मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, आमदार आदीसोबत आढावा बैठक घेतली.
नाव बदलण्याने विकास होईल का-
औरंगाबादचे नामकरण करून संभाजीनगर केले असता, त्याचा विकास होईल का?असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी औरंगाबाद नावाने काय विकास झाला किंवा, औरंगजेब याबद्दल प्रेम असण्याचे कारण काय? असे ते म्हणाले.