सोलापूरसोलापूरशहराजवळ असलेल्या होटगी गावातील मौलाना आझाद पॉलिटेक्निक महाविद्यालयातील 391 विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने सामुहिक कॉपी प्रकरणी एक वर्षासाठी डीबारकेले होते. एकाच वेळी 391 विद्यार्थ्यांना एमएसबीटीईने डीबार केल्याने सोलापुरात एकच खळबळ उडाली होती. अखेर एमएसबीटीई ने 14 सप्टेंबर रोजी रात्री एक आदेश पारित केला व 21 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान या सर्व 391 विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा फेर परीक्षा घेणार असल्याचे जाहीर केले आहे.
मास कॉपी केल्याने 391 विद्यार्थ्यांना केले होते एक वर्षासाठी डीबारजून ते जुलै 2022 दरम्यान महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळातर्फे सोलापुरातील विविध पॉलिटेक्निक महाविद्यालयात परीक्षा घेण्यात आल्या होत्या. परीक्षेनंतर या सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका तपासणीसाठी गेल्या होत्या .होटगी गाव येथील मौलाना आझाद पॉलिटेक्निक महाविद्यालयातील सर्व शाखांमधील फर्स्ट ते थर्ड या वर्गातील जवळपास 600 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या होत्या. पण ऑगस्ट महिन्यात मौलाना आझाद कॉलेज प्रशासनाला एमएसबीटीईकडून 396 विद्यार्थ्यांची उत्तर पत्रिकामधील उत्तरे सारखीच आहेत.