सोलापूर -मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आज (रविवारी) मराठा क्रांती मोर्चाबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. 4 जुलै रोजी सोलापुरात भव्य आणि उग्र स्वरूपात मोर्चा निघणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी यंदाचे मोर्चे हे बोलके असणार आहेत. 4 जुलै रोजी हा मोर्चा सकाळी संभाजी महाराज पुतळा येथून सुरू होणार आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी मोर्चा निघणार असल्याची माहिती अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी माहिती दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कोल्हापूर नंतर सोलापुरात मोर्चा काढत असल्याची माहिती यावेळी दिली, तसेच राज्यातील सर्वात मोठा उग्र मोर्चा होणार असल्याची माहितीही यावेळी पत्रकार परिषदेत दिली.
Maratha Reservation : सोलापुरात मराठा आरक्षणासाठी 4 जुलैला भव्य मोर्चा; नरेंद्र पाटलांची माहिती
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी यंदाचे मोर्चे हे बोलके असणार आहेत. 4 जुलै रोजी हा मोर्चा सकाळी संभाजी महाराज पुतळा येथून सुरू होणार आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी मोर्चा निघणार असल्याची माहिती अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी माहिती दिली आहे.
मराठा समाजातील शेतकरी बांधव देखील या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. जुना पुणे नाका येथील संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून 4 जुलैच्या मोर्चाला सुरूवात होणार आहे. शनिवारी दिवसभर सोलापुरातील लोकप्रतिनिधीसोबत हेरिटेज मंगल कार्यालयात गुप्त बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर मोर्चाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. तसेच या मोर्चात सहभागी होण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी सोलापुरातील लोकप्रतिनिधीसोबत बैठक घेऊन चर्चा करणार आहेत आणि त्यांना मोर्चाचे निमंत्रण देखील देण्यात येणार असल्याची माहिती अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली आहे.
'पोलिसांनी परवानगी नाकारली तरी मोर्चा होणारच'
कोरोना महामारीचे कारण समोर करून पोलिसांनी परवानगी नाकारली तरी सोलापूरमध्ये भव्य मोर्चा काढणार असल्याची माहिती नरेंद पाटील यांनी दिली आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील मराठा समाजाला, नागरिकांना मोर्चात सहभागी होऊ न दिल्यास, त्या ठिकाणी मराठा बांधव रास्ता रोको आणि महामार्गवर रस्ता बंद करतील, असा इशारा देखील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.
अशी असेल मोर्चेबांधणी
28 जून -
पंढरपूर येथे सकाळी बैठक.
मंगळवेढा येथे दुपारी 2 वाजता बैठक.
सांगोला येथे संध्याकाळी 5 वाजता बैठक.
29 जून रोजी-
माळशिरस आणि अकलूज येथे सकाळी 10 वाजता बैठक.
माढा कुर्डवाडी येथे दुपारी 3 वाजता बैठक.
करमाळा येथे सायंकाळी 6 वाजता बैठक.
30 जून रोजी-
बार्शी येथे सकाळी 10 वाजता बैठक.
मोहोळ येथे दुपारी 2 वाजता बैठक.
सोलापूर उत्तर तालुका आणि दक्षिण तालुका येथे सायंकाळी 6 वाजता बैठक.
1 जुलै रोजी-
अक्कलकोट येथे सकाळी 10 वाजता बैठक.
अक्कलकोट बैठक नंतर सोलापुरात पत्रकार परिषद
2 जुलै रोजी-
2 जुलै रोजी सकाळी सोलापूर शहरात 9 वाजता बाइक रॅली.
4 जुलै रोजी-
सोलापूर शहरातील संभाजी चौक येथून सकाळी मोर्चाला सुरूवात आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
हेही वाचा -मराठा आरक्षणासाठी विनोद पाटलांची सर्वोच्च न्यायालयात धाव, पुनर्विचार याचिका दाखल