Live Updated On Voting :
- सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५६.४१ टक्के मतदान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
- सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी जेऊरमध्ये बजावला मतदानाचा हक्क
नागराज मंजुळे - सैराट -दिग्दर्शक - दुपारी ३ वाजेपर्यंत ४४.१३ टक्के मतदान
- दुपारी १ वाजेपर्यंत ३३.४१ टक्के मतदान
- राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांनी पत्नीसह निमगावात बजावला मतदानाचा हक्क
बबनराव शिंदे - आमदार राष्ट्रवादी
राष्ट्रवादीचे माढ्यातील आमदार आणि लोकसभेचे उमेदवार संजय शिंदे यांचे बधू बबनराव शिंदे यांनी आज निमगावमध्ये मतदान केले. यावेळी त्यांनी संजय शिंदे प्रंचड मताधिक्क्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. या निवडणुकीत प्रचार शेती प्रश्नावर आधारीत होणे गरजेचे होते, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
माढा मतदारसंघात मतदारांच्या रांगा - १२:००- सकाळी ११ वाजेपर्यंत १९.६३ टक्के मतदान
- ११:३० - सकाळी ११ वाजेपर्यंत १८ टक्के मतदान
- माढा लोकसभेसाठी जेष्ठ आमदार गणपत आबा देशमुख यांनी मतदान केले. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
- माढ्यात महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद
माढा मतदारसंघात महिला मतदारांचा मतदानासाठी उस्फूर्त प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. मतदानकेंद्राबाहेर महिला मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले
- विजयसिंह मोहितेपाटलांनीही केले मतदान
- रणजितसिंह मोहिते पाटलांनी सहकुटुंब अकलुजमध्ये बजावला मतदानाचा हक्क्
- माढा लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विकासावर न बोलता केवळ मोहिते -पाटलांवर टीका करण्यात आली. - रणजितसिंह मोहिते
- विरोधकांच्या या वैयक्तिक टीकेला माढ्याचा मतदार मतदानातून उत्तर देईल, मोहिते-पाटलांचा दावा
- १०:०० - माढा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.८५ टक्के मतदान
- ८.०० - राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांनी निमगांव येथे बजावला मतदानाचा हक्क.
- ७.५० - माढ्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांचे मूळ गाव निमगाव येथील २६९ जिल्हा परिषद मतदान केंद्रावरील ईव्हीेम मशिन सकाळपासून बंद. नवीन मशीन मागवण्यासाठी लागला वेळ. मतदान केंद्रावर एक तासाने मतदान सुरू.
- ७.०० - माढा लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात
माढा लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे. पवार आणि मुख्ममंत्र्यांनी प्रतिष्ठेची केलेल्या या मतदारसंघात मोहिते-पाटलांसाठी ही निवडणूक अस्तित्वाचा लढा ठरणार आहे, तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाचे उमेदवार संजय शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी गावंच्या-गावं पिंजून काढायला सुरुवात केली होती. या निवडणुकीत लढा लोकसभेचा पण, चर्चा मात्र मोहिते-शिंदेंच्या राजकीय शह-काटशहाची सुरु आहे. त्यातूनच परस्परांच्या विरोधात टीकेच्या फैरी झडत होत्या.