सोलापूर - लोकमंगल फाऊंडेशनतर्फे विडी कामगार, यंत्रमागधारकांसह बेघर आणि गरीब लोकांना अन्नदान करण्यात येत आहे. याची सुरुवात शनिवारपासून लोकमंगल जीवक रुग्णालय निलमनगर येथे करण्यात आली. पहिल्या दिवशी सुमारे एक हजार लोकांना अन्नदान करण्यात आले.
लोकमंगल फाऊंडेशनतर्फे विडी कामगार, यंत्रमागधारकांसह गरजूंना अन्नदान
संचारबंदी संपेपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार असून जितके लोक येतील त्या सगळ्यांना जेवण देण्यात येणार असल्याचे फाऊंडेशनच्यावतीने सांगण्यात आले. शनिवारी अन्नदानाला सुरुवात झाली असून सोशल डिस्टन्सिंग ठेवून पहिल्या दिवशी सुमारे हजार लोकांना जेवण देण्यात आले.
सोलापुरातील पुर्व भाग हा बहूतांश कामगार वस्तीचा भाग म्हणून ओळखला जातो. विडी कामगार आणि यंत्रमाग कामगार या भागात मोठ्या प्रमाणावर राहतात. सध्याच्या संचारबंदीच्या काळात कोणालाच काम नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकमंगल फाऊंडेशनच्यावतीने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. निलमनगर येथील लोकमंगल जीवक रुग्णालय येथे रोज ११ ते २ या वेळेत अन्नदान करण्यात येत आहे.
संचारबंदी संपेपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार असून जितके लोक येतील त्या सगळ्यांना जेवण देण्यात येणार असल्याचे फाऊंडेशनच्यावतीने सांगण्यात आले. शनिवारी अन्नदानाला सुरुवात झाली असून सोशल डिस्टन्सिंग ठेवून पहिल्या दिवशी सुमारे हजार लोकांना जेवण देण्यात आले. अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जेवण देत असताना गर्दी न होऊ देता अंतर राखण्यात येत आहे. लोकमंगल जीवक हॉस्पीटलच्या आवारात हे अन्नदान केले जात आहे.