सोलापूर - शहरात दारू चोरीचा एक अजब प्रकार समोर आला आहे. एका दारूच्या दुकानात चोरट्याने चक्क बाटली बघण्याच्या बाहाण्याने लंपास केली. दुकानदाराच्या हातातली बाटली हिसकावून हा दारूडा गायब झाला आहे.
VIDEO: दारूसाठी वाटेल ते.. वाईन शॉपमधून बघायला म्हणून घेतलेल्या बाटलीसह तळीरामाने ठोकली धूम - liquor thieft in solapur
शहरात दारू चोरीचा एक अजब प्रकार समोर आला आहे. एका दारूच्या दुकानात चोरट्याने चक्क बाटली बघण्याच्या बहाण्याने लंपास केली. हा चोरीचा प्रकार वाईन शॉपमधील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
...अन् त्याने हातातून दारूची बाटली पळवली !
एक तरुण दारू विकत घेण्याच्या बहाण्याने वाईन शॉपमध्ये आला. यानंतर त्याने दुकानदाराकडे दारूच्या बाटलीची मागणी केली. दुकानदाराने बाटली दाखवताच या व्यक्तीने हाताला झटका देऊन धूम ठोकली. या प्रकारानंतर सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
Last Updated : Dec 24, 2019, 10:42 PM IST