सोलापूर- गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या गायनाची सुरुवात सोलापुरातून ( Lata Mangeshkar Sang First Classical Song ) केली होती. त्याबाबत खुद्द लता दीदींनी ट्विटरवर माहिती देत सांगितले होते. आपल्या वडिलांसोबत एका कार्यक्रमात त्या सोलापुरात आल्या होत्या. पाहिले शास्त्रीय गीताचे ( Classical Songs of Lata Mangeshkar ) सादरीकरण हे सोलापुरात केले होते. दीनानाथ मंगेशकर ( Deenanath Mangeshkar ) यांसमोर लता दीदींनी हट्ट धरून शास्त्रीय गीत सादरीकरण केले ( Lata Mangeshkar Sang First Song in Solapur ) होते. 9 सप्टेंबर, 1938 साली सरस्वती चौक येथील भागवत चित्रमंदिर येथे हा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला होता.
स्वतः लता दीदींनी त्यावेळचा फोटो ट्विट करत दिला होता आठवणींना उजाळा -9 सप्टेंबर, 1938 रोजी दीनानाथ मंगेशकर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन सोलापुरात करण्यात आले ( Deenanath Mangeshkar in Solapur ) होते. त्यावेळी आयोजकांसोबत होत असलेली चर्चा लता दीदी ऐकल्या होत्या. त्यांनी वडील दीनानाथ मंगेशकरांसमोर मी देखील गीत सादरीकरण करणार असल्याचा हट्ट धरला होता. दीनानाथ मंगेशकर यांनी अजून तू खूप लहान आहेस, मंचावर गाण्यासाठी खूप काही शिकायचे आहे, अशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. आयोजकांनीही मास्टर दीनानाथ मंगेशकर यांना लता दीदींनी गीत सादरीकरण करावे, अशी विनंती केली. आयोजकांनी सोलापुरात ' पिता पुत्री का अनोखा जलसा, एक अनोखा शो', अशी जाहिरात केली होती. या कार्यक्रमात लता दीदींनी राग खंबावतीमध्ये एक रचना गायली आणि त्यानंतर वडिलांच्या लोकप्रिय नाटकांपैकी एक गाणेही गायिले. श्रोत्यांनी त्यांच्या त्यांच्या गायनाला भरभरून प्रतिसाद दिला. लता मंगेशकर या थकून वडिलांच्या मांडीवर झोपी गेल्या होत्या.