महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

खळबळजनक! इच्छेविरुद्ध माझे लिंग परिवर्तन केलं; सोलापुरातील किन्नरचा गंभीर आरोप - सोलापुरातील किन्नरचा दुसऱ्या किन्नरवर आरोप

माझ्या इच्छेविरुद्ध माझे लिंग परिवर्तन केले आहे. मला वेळोवेळी मारहाण करुन मला पैशांची मागणी करण्यात येते, असा धक्कादायक आरोप सोलापुरातील एका किन्नरने केला ( kinner allegations over Changed his gender ) आहे.

kinner in solapur
kinner in solapur

By

Published : Jul 25, 2022, 10:31 PM IST

सोलापूर - सोलापूर शहरात जवळपास दोन हजार किन्नर वास्त्यव्य करत आहेत आणि यांच्या मध्ये अनेक गट आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी पैसे मागताना किन्नर दिसून येतात. पण, सोलापूर शहरातील एका किन्नरने दुसऱ्या किन्नरांवर धक्कादायक आरोप केला आहे. माझ्या इच्छेविरुद्ध माझे लिंग परिवर्तन केले आहे. मला वेळोवेळी मारहाण करुन मला पैशांची मागणी करण्यात येते. रोज जमा केलेली रक्कम माझ्याकडून काढून घेतली जाते. इच्छा नसताना बळजबरीने माझे लिंग परिवर्तन करण्यात आले. त्या लिंग परिवर्तनाचा खर्च देखील माझ्याकडून वसूल केला जात असल्याचा आरोप, पीडित किन्नरने केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली ( kinner allegations over Changed his gender ) आहे.

पीडित किन्नर प्रतिक्रिया देताना

'सहा वर्षांपासून किन्नर म्हणून आयुष्य सुरु' - पीडित 26 वर्षीय किन्नर सोलापुरातील समाधान नगर येथे वास्तव्यास आहे. पीडिताने सांगितलं की, जन्मजात किन्नर आहे. गेल्या सहा वर्षांपासून साडी परिधान करून शहरात विविध ठिकाणी पैसे मागून स्वतःची उपजीविका चालवत आहे. माझ्यावर माझे आई-वडील आणि भाऊ यांची जबाबदारी आहे. पण, गेल्या वर्षभरात माझ्यावर दुसऱ्या किन्नरांनी अनेक अत्याचार केले. माझी सर्व कमाई काढून घेतली व बेदम मारहाण करण्यात आली. सोलापुरातील हे दोन किन्नर असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही पीडित किन्नरने केली आहे. तसेच, याबाबत पोलीस आयुक्तांना निवेद दिल्याचे सांगितलं आहे.

'इच्छा नसताना बळजबरीने माझे लिंग परिवर्तन' - पीडित किन्नरने म्हटलं की, जन्मजात किन्नर आहे. किन्नरांच्या एका विशिष्ट गटात सहभागी झाल्या पासून अनेक अत्याचार करण्यात आले. खोटी माहिती देऊन इच्छा नसताना मला खोट सांगून पुणे येथे घेऊन गेले. पुण्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये मला नॉर्मल ट्रीटमेंट आहे म्हणून सांगितले. बेशुद्ध करून माझे लिंगपरिवर्तन केले. ही बाब मला शुद्धीवर आल्यानंतर कळली. परत मला जबर धक्का बसला. तसेच या लिंग परिवर्तनाचा 5 लाख रुपयांचा खर्च देखील मागितला जात आहे. यासाठी इतर किन्नर मला जबर मारहाण करून माझी रोजची कमाई काढून घेतात, अशी माहिती या पीडित किन्नरने दिली आहे.

'माझ्यासोबत अन्य किन्नरांना देखील मारहाण' - पीडित किन्नर धक्कादायक आरोप केले आहेत. 'माझ्यासोबत अन्य किन्नरांना देखील जबर मारहाण केली जाते. त्याबाबतचा व्हिडीओ देखील रेकॉर्ड करुन किन्नरांच्या व्हॉट्सअॅप वर व्हायरल केला आहे. पण, या अत्याचाराविरोधात कुणाही आवाज उठवत नाही. अनेक किन्नर सोलापूर सोडून जात आहेत. तर, हा सर्व प्रकार सत्य आहे, अशी माहिती किन्नर समाजाचे अध्यक्ष यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.

हेही वाचा -Ranveer Singh : रणवीर सिंगला न्यूड फोटोशूटचं प्रकरण भोवणार?, पोलिसांत तक्रार दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details