महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 23, 2020, 8:41 AM IST

ETV Bharat / city

भाजप सरकारच्या काळा सुशिक्षितांवर बेरोजगारीची कुऱ्हाड - जयंत पाटील

भाजपच्या राज्यात सुशिक्षित बेरोजगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कोणाला आणि किती लोकांना रोजगार मिळाला हा संशोधनाचा विषय आहे. रोजगारांच्या कमी संधीमुळे भाजप विरोधात लोकांच्या मनात आक्रोश आहे. भाजपने रोजगाराच्या किती संधी दिल्या हे सांगावे, असे आव्हान जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोलापुरात दिले.

jayant patil
जयंत पाटील

सोलापूर- मागील सहा वर्षांमध्ये राज्यात सुशिक्षित बेरोजगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कोणाला आणि किती लोकांना रोजगार मिळाला हा संशोधनाचा विषय आहे. रोजगारांच्या कमी संधीमुळे भाजप विरोधात लोकांच्या मनात आक्रोश आहे. रोजगाराच्या संधी निर्माण करु न देण्याचे भाजपचे धोरण आहे. भाजपाने रोजगाराच्या किती संधी दिल्या हे सांगावे, असे आव्हान जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोलापुरात दिले.

पुढे पाटील म्हणाले, की महाविकास आघाडीने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. शिक्षक वर्गांचे काम केले आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्यास शिक्षक पदवीधर, पदवीधर मतदारसंघाचे प्रश्न सोडवू, असेही जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले. तसेच काही राजकारणी जनतेत अफवा आणि गैरसमज पसरवण्याचे काम करत आहे, की महाविकास आघाडीचा त्यांना पाठिंबा आहे. जनतेला दिशाभूल करण्याचे काम सुरू असून त्याला बळी पडू नका. महाविकास आघाडीचे अरुण लाड, आसगवाकर हेच अधिकृत उमेदवार आहेत असे सांगत माजी आमदार दत्तात्रय सावंत यांना टोला लावला. पदवीधर संघातील अरुण लाड, शिक्षक मतदार संघातील जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आज रविवारी सोलापुरातील हेरिटेज लॉन्स येथे महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जयंत पाटील बोलत होते.

जयंत पाटील सभेत बोलताना..
यावेळी व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, दीपक आबा साळुंखे, आमदार बबनदादा शिंदे, उमेश पाटील, आमदार संजय मामा शिंदे, माजी महापौर मनोहर सपाटे, दिलीप कोल्हे, गटनेते चेतन नरोटे, माजी आमदार दिलीप माने, सिद्धाराम म्हेत्रे, नगरसेवक गणेश वानकर, प्रशांत बर्डे, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक विनोद भोसले, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, शहराध्यक्ष भारत जाधव, शहर युवक अध्यक्ष जुबेर बागवान उपस्थित होते.

भाजपने मंदिरे उघडण्यासाठी राजकारण केले -

पाटील म्हणाले, कोरोनाच्या काळातही भाजपाने राजकारण केले. मंदिरे उघडण्यासाठी आंदोलने केली. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेचा विचार केला आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेत पाडवाच्या शुभमुहूर्तावर मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीच्या वतीने कर्जमाफी करण्यात आली. यापुढे शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील विविध प्रश्न सोडवू, असे पाटील म्हणाले.

तर भाजपला चालता चालता पाडू शकतो- उदय सामंत
महाविकास आघाडीच्यावतीने दोन्ही उमेदवार रिंगणात आहे. ही लढाई सांघिक लढाई आहे. सर्वजण एकजुटीने लढल्यास भाजपला चालता चालता पाडू शकतो. सर्वांनी मतभेद विसरून कामाला लागले पाहिजे. कोरोना कोरोना काळातही परीक्षाचे चांगले नियोजन झाले. साडेतीन लाख विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षा दिली त्या मध्ये एकाही विद्यार्थ्याला कोरोनाची बाधा झाली नाही. किंवा एकही विद्यार्थ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. शिक्षकांचे ज्या काही प्रलंबित प्रश्न आहे ते आपण सोडवू, असे उदय सामंत म्हणाले.

महाविकास आघाडी मोठ्या ताकतीने निवडणूक रिंगणात- सतेज पाटील
मागील पंचवीस वर्षात पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची कधी निवडणूक झाली हे कळत नव्हते. मात्र, आता महाविकासआघाडी मोठ्या ताकतीने उतरली आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची ही निवडणूक सोपी नसून यासाठी मोठ्या ताकदीने काम करणे गरजेचे आहे. सर्वांनी होम टू होम जाऊन उमेदवारांच्या प्रचार करावा. महाविकास आघाडी मोठ्या दणक्यात प्रचार करत असल्यामुळे भाजप तडफड होत आहे. दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी ताकदपणाला लावली आहे.

जागरूक राहून काम करणे गरजेचे- दत्तामामा भरणे
पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महत्त्वाची असून महाविकास आघाडी सरकारने चांगले उमेदवार दिले आहे. सर्वांनी जागरूक राहून दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी व त्यांना मतदान व्हावे यासाठी काम करणे गरजेचे आहे, असे दत्तामामा भरणे म्हणाले.

हेही वाचा - जनतेने कॉंग्रेसला कात्रजचा घाट दाखवला - देवेंद्र फडणवीस

ABOUT THE AUTHOR

...view details