महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rising Inflation जीएसटीचा निषेध करत राष्ट्रवादीने पंतप्रधानासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस पाठवल्या राख्या - rakhis to Prime Minister

केंद्र सरकारने केलेली सिलेंडरमधील भाववाढ ( Gas price hike ) तसेच खुल्या पदार्थावरील जीएसटी ( GST ) वाढीचा देशभरातून विरोध केला जातोय. वाढत्या जीएसटीचा निषेध ( Protest against GST ) म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने ( Nationalist Congress ) पंतप्रधान ( Prime Minister Narendra Modi ) तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांना त्यांच्या प्रतिमेच्या राख्या पाठवल्या आहेत.

Rising Inflation
वाढती महागाई

By

Published : Aug 10, 2022, 7:33 PM IST

Updated : Aug 10, 2022, 9:09 PM IST

पुणे :दोन दिवसावर रक्षाबंधन ( Rakshabandhan festival ) आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस ( Nationalist Congress ) पार्टीकडून वाढत्या महागाईचा निषेध ( Protest against rising inflation ) केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ), राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadwanis ) यांना त्यांच्या छायाचित्राची राखी आणि त्या भोवती वाढत्या महागाईचे पदार्थाचे असलेले चित्र राख्या पोस्टद्वारे आज पाठवण्यात आलेल्या आहेत.

जीएसटीचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधानासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडवणीसांना पाठवल्या राख्या

हेही वाचा -Bail To Varvara Rao: डॉ. पी वरवरा राव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर; वाचा, कोण आहेत वरवरा राव

जीएसटीचा निषेध -केंद्र सरकारने केलेली सिलेंडर मधील भाववाढ तसेच खुल्या पदार्थावरील जीएसटी वाढीचा देशभरातून विरोध केला जातोय. वाढत्या जीएसटीचा निषेध ( Protest against GST ) म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या प्रतिमेच्या राख्या पाठवल्या आहेत. महागाईचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेला आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी हे सगळे आमचे भाऊ आहेत. आम्ही त्यांना ऱाख्या पाठवून देशातील वाढती महागाई कमी करण्यासाठी राख्या पाठवल्या असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्तांनी दिली आहे.

हेही वाचा -Uday Umesh Lalit Chief Justice : महाराष्ट्राचा पुन्हा 'सर्वोच्च सन्मान'; न्यायमूर्ती उदय उमेश ललित नवे सरन्यायाधीश

Last Updated : Aug 10, 2022, 9:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details