पंढरपूर -देशातील सर्वात मोठा सण उत्सव म्हणून दिवाळी सण साजरा केला जातो. या दिवाळीत अकलूज येथील यशवंत नगर येथे राहणाऱ्या देशमुख कुटुंबियांनी सर्व धर्म समभाव असणारा आकाश कंदील तयार केला आहे. त्यातून त्यांनी दिवाळीसारख्या सणातून सर्वधर्मसमभाव जपण्याचा संदेश दिला आहे.
मानवतेचा संदेश देण्याचा प्रश्न -
सेवानिवृत्त शिक्षक मोहनराव देशमुख यांनी सणावाराला जनजागृती करण्याचे काम करतात. यामध्ये त्यांना त्यांच्या कुटुंबातील उच्च शिक्षित सदस्यही साथ देतात. गणपती सणातील गौराई समोरील देखावे असतील किंवा दिवाळी सारख्या सणातून समाजाला एक संदेश देण्याचे काम देशमुख कुटुंबियांनी केले आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये देशमुख कुटुंबियांनी कोरोना महामारी कोरोना योद्धांचा देखावा सादर केला होता. तर यावर्षी ऑलिम्पिक विजेत्या संघाचा देखावा त्यांनी गौऱ्याच्या समोर ठेवला होता. ह्यातून एक प्रकारचा मानवतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करत असल्याचेही मोहनराव देशमुख यांनी सांगितले आहे.