सोलापूर -मुख्याध्यापकांनी दशसुत्री ची प्रभावी अंमलबजावणी करावी. 'हर घर तिरंगा' ( Har Ghar Tiranga ) उपक्रमांत दिरंगाई किंवा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, अशा सूचना सोलापूर जिल्हा परिषदेचे ( Solapur Zilla Parishad ) सिईओ दिलीप स्वामी यांनी दिल्या आहेत. सोलापूर येथील हुतात्मा स्मृती मंदिर येथे जिल्हा परिषद ( Zilla Parishad ) प्राथमिक शाळेतील गुणवत्तावाढी दशसुत्री उपक्रमाच्या अमलबजावणीसाठी कार्यशाळेचे आयोजन ( Conducting workshops ) करण्यात आले होते. या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून सिईओ स्वामी बोलत होते. मुख्याध्यापकांना व केंद्रप्रमुखाना दिलीप स्वामींनी सविस्तर मार्गदर्शन यावेळी केले आहे.
विद्यार्थ्यांना स्वावलंबन बनवा-प्राथमिक शाळेत ज्ञानदान करणार्या शिक्षकांना समाजात आदराने गुरुजी या नावाने संबोधण्यात येते. गुरु शब्दाला 'जी' हा फक्त शिक्षकांसाठीच लागला आहे. आयएएस अधिकाऱ्यांना ( IAS officers ) देखील त्यांच्या पदाच्या पुढे 'जी' शब्द लावून त्यांना संबोधले जात नाही. केवळ पगारापुरते काम असे, न करता सेवानिृवृत्ती नंतर समाजात भावी पिढी तयार व्हायला पाहिजे. असे काम मनाने करा, असे आवाहन जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी ( Solapur Zilla Parishad ) दिलीप स्वामी यांनी केले आहे.
बदलत्या काळानुसार शिक्षण द्या-जिल्हा परिषद सीईओ स्वामी म्हणाले, बदलत्या काळानुसार मुलांना शिक्षण देणे गरजेचे आहे. मुलांना केवळ पुस्तकी अभ्यासक्रमच न शिकवता, भावी पिढी संस्कारी व्हावी अशी शिकवण देणे गरजेचे आहे. काही वेळा विद्यार्थी हे वाममार्गाकडे जात असताना दिसतात. शिक्षक गप्प बसण्याची भूमिका घेत असतात. असे न करता विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देत आदरयुक्त व्यक्ती बनवा. शिक्षण तज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक यांचे मत विचारात घ्या.
साडेचार हजार मुली सायकलीविना-सोलापूर जिल्हात साडेचार हजार मुलींना पायी चालत शाळेत जावे लागते. यांना वेळेत सायकल उपलब्ध झाली नाही, तर या मुली सायकली नसल्यामुळे शिक्षणापासून दूर होतील. या मुलींना सायकली द्या, असे आवाहन दिलीप स्वामी यांनी केले. पाचशेपेक्षा अधिक मुलींना सायकली मिळाल्या. निमगाव शाळेने सुरू केलेला उपक्रम दिशा दर्शक ठरत असला, तरी मदतीची आवश्यकता आहे. मुख्याध्यापक यांनी पुढाकार घ्यावा, असे भावनिक आवाहन दिलीप स्वामी यांनी केले आहे.