सोलापूर- वरिष्ठ वैद्यकीय अध्यापक व महिला अध्यापकांना वैद्यकीय शिक्षण सचिव यांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध सोलापुरात ( Agitation Against Secretary of Medical Education ) करण्यात आला. डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांनी धरणे आंदोलन करत काम बंद केले ( Government Medical College Teachers ) आहे. यामुळे शासकीय महाविद्यालयातील सर्व कामकाज ठप्प झाले आहे. डॉ. व्ही. एम. शासकीय महाविद्यालय सलंग्नीत असलेले छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयावर या आंदोलनाचा परिणाम झाला नाही. तेथील सर्व कामकाज आणि रुग्णसेवा सुरळीत सुरू असल्याची माहिती आंदोलकांनी दिली.
विविध मागण्या घेऊन गेले होते वैद्यकीय शिक्षण सचिवांकडे -राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काम करणाऱ्या प्राध्यापकांनी ( Government Medical College Teachers ) आपल्या विविध मागण्या घेऊन 3 फेब्रुवारी, 2022 रोजी वैद्यकीय शिक्षण सचिवांकडे गेले होते. पण, कोरोनामुळे मोजक्याच प्राध्यापकांना भेटण्याची वेळ वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. सौरव विजय यांनी दिली. त्यानुसार मेडिकल कॉलेज मधील काही मोजके पदाधिकारी वैद्यकीय शिक्षण सचिवांना भेटण्यासाठी गेले, मात्र त्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेता, अरेरावीची भाषा वापरली, असा आरोप आंदोलकांनी सांगितले. आपल्या विविध मागण्याचे निवेदन स्वीकारण्याऐवजी अपमानास्पद वागणूक देण्यात आली. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सोलापूरसह राज्यभरात वैद्यकीय शिक्षण सचिवांचा निषेध केला जात आहे.