सोलापूर -कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर काही मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत सोलापुरातील प्रसिद्ध अशा शक्ती देवी किंवा रुपाभवानी मंदिरात घटस्थापना झाली. दरवर्षी लाखो भाविक पहाटेपासून रुपाभवानी मंदिरात दाखल होतात आणि या लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये भक्तिमय वातावरणात घटस्थापना केली जाते. यंदा मात्र, या शारदीय महोत्सवाला कोरोना महामारीचे ग्रहण लागले आहे.
कोरोना महामारी: रुपा भवानी मंदिरात पोलीस बंदोबस्तात घटस्थापना - सोलापूर नवरात्रोत्सव बातमी
रुपाभवानी मंदिरात शनिवारी पाहटे काकडा आरती झाली. त्यानंतर सकाळी 10 वाजता महापूजा झाली. ही महापूजा झाल्यानंतर 11.30 वाजण्याच्या सुमारास घटाची पूजा करून घटस्थापना करण्यात आली. संध्याकाळी महापूजा होणार असून त्यानंतर छबिनाचे कार्यक्रम होणार आहे. मंदिर समितीकडून भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी मंदिरात न येता घरात बसून देवीची आराधना करावे, असे आवाहन पुजाऱ्यांनी केले आहे.
सोलापूरची शक्ती देवी रुपाभवानी मंदिरात शनिवारी पाहटे काकडा आरती झाली. त्यानंतर सकाळी 10 वाजता महापूजा झाली. ही महापूजा झाल्यानंतर 11.30 वाजण्याच्या सुमारास घटाची पूजा करून घटस्थापना करण्यात आली. संध्याकाळी महापूजा होणार असून त्यानंतर छबिनाचे कार्यक्रम होणार आहे. मंदिर समितीकडून भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी मंदिरात न येता घरात बसून देवीची आराधना करावे, असे आवाहन पुजाऱ्यांनी केले आहे.
कोरोना महामारीमुळे गर्दी होता कामा नये, असे शासनाने दिलेली नियमावली आहे. जेणेकरून गर्दीमधून कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये. या नियमावलीला अनुसरून सोलापूर शहर पोलिसानी रुपाभवानी मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. एकही भाविकाला मंदिरात प्रवेश दिला नाही. जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शिवशंकर बोनदर, करणकोठ, दंगा नियंत्रण पथक, क्यूआरटी टीम, महिला पोलीस कर्मचारी, होमगार्ड आदी पोलीस फौजफाटा कडक बंदोबस्तासाठी तैनात आहे.