सोलापूर- महानगरपालिकेत आज शनिवारी सभा सुरू होण्यापूर्वी सर्व पक्षांनी सत्ताधारी भाजपचा निषेध करत सभागृहातच आंदोलन केले. यावेळी स्मार्ट सिटी, पाणीपट्टी, करवाढ व्यवस्था आदी विषयांवर सत्ताधारी भाजप पक्षाचा निषेध करत असल्याची माहिती आंदोलक नगरसेवकांनी दिली. आज शनिवारी सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा नियोजित करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व पक्षाचे नगरसेवक पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात उपस्थित होते.
सोलापूर पालिकेत सत्ताधारी भाजपविरोधात सर्वपक्षीय एकवटले - सोलापूर महानगरपालिकेतील सभा
शनिवारी सभा सुरू होण्यापूर्वी सर्व पक्षांनी सत्ताधारी भाजपचा निषेध करत सभागृहातच आंदोलन केले. यावेळी स्मार्ट सिटी, पाणीपट्टी, करवाढ व्यवस्था आदी विषयांवर सत्ताधारी भाजप पक्षाचा निषेध करत असल्याची माहिती आंदोलक नगरसेवकांनी दिली. आज शनिवारी सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा नियोजित करण्यात आली आहे.
सोलापूर महानगरपालिकेतील सर्व पक्षीय नगरसेवकांनी सत्ताधारी भाजप पक्षाचा निषेध व्यक्त करत सभागृहातच आक्रमक होत आंदोलन केले. सोलापूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता येऊन चार वर्षे झाली. या चार वर्षात भाजपने सोलापूर शहराच्या विकासासाठी काय केले? असा सवाल उपस्थित करत निषेध व्यक्त केला. पालिकेने शहर वासियांना सुरळीत पाणी पुरवठा द्यावा, दररोज करण्याऐवजी 4 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. सत्तेत येण्यापूर्वी भाजपने दररोज पाणी पुरवठा करू, असे आश्वासन दिले होते. पण, आजतागायत दररोज पाणी पुरवठा झाला नाही, याचा निषेध यावेळी करण्यात आला.
स्मार्ट सिटी की डर्टीसिटी-
स्मार्ट सिटीच्या नावाखाली सोलापूर शहरात खोदाई करण्यात आली आहे. यामुळे शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. स्मार्ट सिटी या गोंडस नावाखाली शहराचे विद्रुपीकरण करण्यात आले आहे. या स्मार्ट सिटीला आंदोलकांनी डर्टीसिटी नाव देत स्मार्ट सिटीच्या कामाचा निषेध व्यक्त करण्यात आला.