महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सोलापुरात मुळशी पॅटर्न; गुंडगिरी करणाऱ्या टोळीचा एकावर खुनी हल्ला - गुंडाच्या हल्ल्यात एक जण जखमी

सोलापुरात गँगवारची एक घटना समोर आली आहे. किरकोळ घटनेवरून एकास सहा ते सात जणांनी मिळून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

गुंडगिरी करणाऱ्या टोळीचा एकावर खुनी हल्ला
गुंडगिरी करणाऱ्या टोळीचा एकावर खुनी हल्ला

By

Published : Nov 12, 2020, 9:05 PM IST

Updated : Nov 12, 2020, 9:12 PM IST


सोलापूर- शहरातील गुंडागर्दीचे प्रमाण वाढत असून मुळशी पॅटर्न सिनेमात दाखवल्याप्रमाणे गँगवार तोंड वर काढताना दिसून येत आहे. अशीच एक घटना शहरातील पूर्व भागातील विनायक नगर येथे घडली आहे. एका जुन्या गॅंग मधील व्यक्तीवर खुनी हल्ला करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. अमृत हणमंत माशाळकर (वय 39,रा विजय नगर,पूर्व भाग,सोलापूर) हे जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात यावर उपचार सुरू आहेत.


विकी उर्फ टिल्या जालिंदर मंजुळकर, सोफीलाल महंमद हुसेन शहापूरे, अभिषेक रामू म्हेत्रे, नागेश आणि त्याच्या इतर तीन साथीदारांनी बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा खुनी हल्ला केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गुंडगिरी करणाऱ्या टोळीचा एकावर खुनी हल्ला

शाळा परिसरात गोंधळ घालण्यास विरोध-

या घटनेची सविस्तर माहिती अशी की, विकी उर्फ टिल्या जालिंदर मंजुळकर हा विजय नगर येथील एका जिल्हा परिषद शाळेत कुणालाही आणून मारहाण करत होता. तसेच शाळेच्या परिसरात दारू पिऊन बाटल्या फोडणे किंवा शाळेच्या परिसरात दादागिरी करण्याचे उद्योग करत होता. त्याच्या या वाढत्या दादागिरी विरोधात शाळेतील शिक्षकांनी परिसरात राहणाऱ्या अमृत हणमंतू मशाळकर यांना दखल देण्यासंदर्भात विनंती केली. त्यानंतर मशाळकर याने विकी उर्फ टिल्या जालिंदर मंजुळकर याला समजावून सांगितले होते. शाळेच्या आसपास असे कृत्य करू नकोस, अशी समज दिली.

मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद

मात्र, माशाळकर याचा राग मनात धरून विकी उर्फ टिल्या आणि त्याच्यां साथीदारांनी बुधवारी सकाळी अमृत हणमंतू मशाळकर यांच्यावर शाळेजवळच काठ्या, दगड आणि लोखंडी रॉडने हल्ला चढविला. या मारहाणीत माशाळकर हे गंभीर जखमी झाले. मारहाणीची ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

जखमी माशाळकरांना उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसानी घटनास्थळी जाऊन पाहणी करत मारहाण करणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच एका आरोपीला जेरबंदही केले आहे. बाकीच्या आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक मोरे यांनी दिली.

Last Updated : Nov 12, 2020, 9:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details