सोलापूर- शेगाव निवासी संत गजानन महाराजांच्या पालखीचे ( Gajanan Maharaj Palkhi ) आज सोलापूर शहरात आगमन झाले आहे. सोलापूरकरांनी अतिशय आनंदी वातावरणात गुलाबपुष्पवृष्टी करून पालखी सोहळ्याच स्वागत केले. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, ( Police Commissioner Dr. Rajendra Mane ) उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर, सहायक पोलीस आयुक्त माधव रेड्डी, जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, यांनी पालखीला वंदन करून दर्शन घेतले. पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, तसेच डीसीपी डॉ. वैशाली कडुकर यांनी वारकरी टोपी परिधान करून गजानन महाराज पालखाची पूजा केली आहे.
Gajanan Maharaj Palkhi : गजानन महाराज पालखीचे सोलापूरकरांनी केले स्वागत
हेही वाचा -Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्ष झालेल्या राहुल नार्वेकरांचा राजकीय प्रवास...
गजानन महाराजांच्या पालखीचे आज सोलापूर शहरात आगमन संत गजानन महाराज पालखीचे 53 वे वर्ष-सोलापूर शहरात संत गजानन महाराज पालखी दाखल होताच सोलापूर शहर पोलीस ( Solapur City Police ) प्रशासनाकडून परंपरागत पद्धतिने स्वागत करण्यात आले. गजानन महाराज पालखीच हे ५३ वे वर्ष असून कोरोनामुळे मागचे दोन वर्ष वारकऱ्यांना पायी वारीला मुकावे लागले होते. सोलापूर शहरामध्ये गजानन महाराज पालखीचा सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस मुक्काम असणार आहे. त्यामुळे सोलापूर मधील वारकरी भाविकांमध्ये आनंदाच वातावरण आहे. रविवारी सकाळी सम्राट चौक येथे 11 वाजता सदगुरु प्रभाकर महाराज मंदिरात आगमन झाले आहे. तसेच दुपारी 4 वाजता सोलापुरातील कुचन प्रशाला येथे आगमन मुक्काम असणार आहे. सोमवारी सकाळी उपलप मंगल कार्यालय येथे आगमन, पालखीचा मुक्काम आहे. उपलप मंगल कार्यालय येथे सकाळी 9 वाजल्यापासून भाविकांना पालखीचे दर्शन घेता येईल. मंगळवारी सकाळी 6 वाजता श्री संत गजानन महाराज पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
हेही वाचा -Rahul Narvekar Assembly Speaker : विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड, सर्वात तरुण अध्यक्ष