सांगली - वर्षभराहून अधिक काळ झाला जगावर कोरोनाचे संकट आहे. कोरोना आजार गेला अशी स्थिती आली असतानाच दुसऱी लाट आली आणि संपूर्ण जग पुन्हा चिंतेत सापडले. या लाटेत रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवेवर मोठा ताण आहे. तसेच या सेवेला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. आज एकीकडे रुग्णांना बेड, ऑक्सिजन लवकर मिळत नसल्याने अनेक मृत्यू होत आहेत. परंतु अशा परिस्थितीतही जत शहरातील डॉक्टर विवेकानंद राऊत हे तालुक्यातील नागरिकांसाठी एक 'देवदूत'चं ठरले आहेत.
डॉक्टर विवेकानंद राऊत यांची मोफत रूग्णसेवा - सांगली कोरोना
वर्षभराहून अधिक काळ झाला जगावर कोरोनाचे संकट आहे. कोरोना आजार गेला अशी स्थिती आली असतानाच दुसऱी लाट आली आणि संपूर्ण जग पुन्हा चिंतेत सापडले. अशा परिस्थितीतही जत शहरातील डॉक्टर विवेकानंद राऊत हे तालुक्यातील नागरिकांसाठी एक 'देवदूत'चं ठरले आहेत.
ही वेळ पैसे नाही तर पुण्य कमावण्याची
जत शहरात अन् तालुक्यात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तर दुसरीकडे वैद्यकीय सेवा कोलमडली आहे. तालुक्याच्या ठिकाणी फक्त १३० इतकेच बेडचे कोव्हिड हॉस्पिटल आहे. तालुक्यात दररोज २५० पर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. येथील कोरोना रुग्णांचे दररोजचे आकडे पाहता नागरिकांच्या मनामध्ये कोरोनाबद्दल एक धास्ती निर्माण झाली आहे. दरम्यान जत शहरामध्ये डॉक्टर विवेकानंद राऊत यांचे मोठे हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये रोज रुग्णांची संख्या वाढते. त्याचे कारण येथील रूग्ण पॉझिटिव्ह असो अथवा निगेटिव्ह, प्रत्येकाचे मनोधैर्य वाढवण्याचं काम येथी डॉक्टर करतात.
मनोधैर्य खचू देवू नका डॉ.राऊत यांनी केले भावनिक आवाहन
पॉझिटिव्ह म्हटले, की शहरातील काही डॉक्टर रुग्णांना सरकारी दवाखान्याकडे पाठवतात. रुग्णाला कोरोनाची अधिकची भीती वाटेल अशी परिस्थिती येथील काही डॉक्टर निर्माण करतात. मात्र अशा परिस्थिती येथील कोरोना रुग्णांना तपासून त्यांना योग्य तो सल्ला देऊन, तसेच त्यांच्यावर योग्य ते उपचार करुन डॉक्टर राऊत त्यांना मानसिक आधार देतात. तसेच रुग्णांचे कोरोनासंबंधीचे लक्षण पाहून त्यांना घरीच राहण्याचा सल्ला डॉक्टर राऊत देतात.
आज १२४ पॉझिटिव्ह रुग्ण, तर ३८ रुग्ण कोरोनामुक्त
आपल्याला कोरोनाचे लक्षणं जास्त प्रमाणात जाणवत असल्यास नागरिकांना सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे डॉ. राऊत सांगतात. सध्या एकीकडे रुग्णांना बेड, ऑक्सिजन किंवा वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नाहीए अशा वेळी जिल्ह्यात हॉस्पिटलमध्ये आपल्या सहकारी डॉक्टरांना सांगून ऑक्सिजन बेडची व्यवस्थाही ते करतात. कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल होईपर्यंत त्यांची काळजी घेत असतात. तसेच होम क्वारंटाईन रुग्णांच्या घरी जाऊन ते त्यांची तपासणी करतात. डॉ. राऊत यांच्या देखरेखेखालील १२४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत ३८ रूग्ण बरे झाले आहेत.
एकीकडे लूट अन् दुसरीकडे सेवा
कित्येक खाजगी आणि काही सरकारी डॉक्टर आजच्या परिस्थितीत कोरोना रुग्णांकडून लाखो रुपये घेत आहेत. तर, दुसरीकडे एकही रुपया न घेता जतमधील डॉक्टर राऊत हे रुग्णांवर उपचार करतात. ते सांगतात ही वेळ पैसे नाही तर पुण्य कमावण्याची आहे. गेल्या वर्षभरापासून राऊत यांची ही सेवा सुरू आहे. ती यावर्षीही चालू ठेवण्याचा त्यांचा ध्यास आहे.
हेही वाचा -आम्ही 'सामना' वाचणे बंद केले आहे; नाना पटोलेंचा संजय राऊतांना टोला