सोलापूर:क्रिप्टोकरन्सीच्या या आभासी चलनाचे आमीश (Cryptocurrency Investment Lure Solapur) दाखवून हजारो सोलापूरकरांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्यात (Cryptocurrency Investment Scam Solapur) आला आहे. दोन महिन्यांपासून सोलापुरातील नागरिक डॉलर दामदुप्पट योजनेत ( Dollar Damduppat Scheme Scam Solapur) पैसे गुंतवणूक करत होते. या दामदुप्पट डॉलर योजनांच्या आमिषाला बळी पडून सोलापूरकरांना चांगलाच चुना लावण्यात आला आहे. सोलापुरातील 'सीसीएच' (क्लाऊड मायनर अॅप) या अमेरिकन अॅपमध्ये कोट्यवधीची गुंतवणूक (CCH App Scam Solapur) करण्यात आली आहे. पण गेल्या चार दिवसांपासून सीसीएच अॅपवर डॉलर निघत नाही. तसेच मॅक्स क्रिप्टो या अॅपमधून डॉलर काढणे दहा दिवसांपासून अचानकपणे बंद झाले आहे. यामुळे गुंतवणूकदारांची धांदल उडाली आहे. मंगळवारी दिवसभर फौजदार चावडी पोलीस ठाणे (Faujdar Chawdi Police Station) येथे गुंतवणूकदारांची फिर्याद देण्यासाठी एकच गर्दी झाली होती. Latest News from Solapur, Solapur Crime
गुंतवणूकदारांच्या यादीत मोठी लोकं-सीसीएच ॲपमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांची धांदल उडाली आहे. सोलापुरातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी,पोलीस, वकील, इंजिनिअर आदी जणांचे जवळपास एक हजार कोटी रुपये बुडाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मंगळवारी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फसवणूक झालेले अनेक तरुण, व्यावसायिक, वकील, सरकारी कर्मचारी तक्रार देण्यासाठी पुढे आले होते.