सोलापूर -जोडभावी पेठ परिसरातील बेटको लॉजिस्टिक चिराग अली कम्पाउंड मुस्लीम कब्रस्तान येथील ट्रान्सपोर्टमधून सुमारे १९ लाखांचा सुगंधित पान मसाला जप्त केला आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभाग आणि सोलापूर शहर गुन्हे शाखेने कडून करण्यात आली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुगंधित पान मसाल्याची कुरियर मार्फत तस्करी - solapur police crime branch news
राजनिवास सुगंधित पान मसाला, एक्स. एल. जाफरानी जर्दा, पंचरत्न किंमाम , मजा सुपारी असा एकूण १९ लाख ४२ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काढण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
कुरियरमधून सुगंधीत तंबाकू बुकिंग - अन्न सुरक्षा अधिकारी रेणुका पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अहमद मेहमूद खान (वय ४८) मुजमील अब्दुल सत्तार शेख (वय ३५) हुजेफ समीर शेख (वय २५, सर्व रा. पंजाब तालीम सिटीजन स्कूलसमोर, उत्तर यांच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुरियरमधून सुगंधीत तंबाकू बुकिंग करण्यात आली होती.खबऱ्याने अचूक माहिती देऊन कुरियर बुकिंगच सर्व मुद्देमाल तपासून बंदी असलेला साठा जप्त करण्यात आला आहे.
मुद्देमालाचा सखोल तपास सुरू -राजनिवास सुगंधित पान मसाला, एक्स. एल. जाफरानी जर्दा, पंचरत्न किंमाम , मजा सुपारी असा एकूण १९ लाख ४२ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काढण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपींनी प्रतिबंधित साठा कोठून आणला? कोणाला देणार होते? आणि यासाठी कोणते वाहन वापरण्यात आले. याबाबत माहिती मिळण्याकरिता पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत.