सोलापूर -मशिदीवरील भोंग्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्र राज्यात वातावरण ढवळून निघाले आहे. मनसेविरुद्ध अनेक पक्ष असा सामना रंगल्याचं चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध करत राज्यातील अनेक मनसैनिकांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. मुंबईसह मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तर, आता सोलापुरातील मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याने राज ठाकरेंनाच चॅलेंज केले आहे. विशेष म्हणजे सोलापुरातील या मनसैनिकाचा राज ठाकरेंनी एकेकाळी सत्कार केला होता.अजित कुलकर्णी असे मनसेचे माजी शहर उपाध्यक्ष आहेत. सध्या ते प्रहार जनशक्ती पक्ष शहर प्रमुख आहेत.
राज ठाकरेंना मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याच चॅलेंज; तुमचं ताफा मी अडवेन - सोलापूर प्रहार संघटना शहराध्यक्ष अजित कुलकर्णी
राज ठाकरे हे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नाहीत, त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश देण्यापेक्षा त्यांनी स्वतः मैदानात उतरावं, असे अजित कुलकर्णी यांनी म्हटले आहे. प्रहार संघटनेकडून हिंदू मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. जातीय सलोखा किंवा हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
त्यांचा ताफा मी अडवेन -सोलापूर प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी हे या अगोदर मनसेचे शहर उपाध्यक्ष होते. सोलापूर शहरातील जोडबसवणा चौक येथे इफ्तार पार्टी आयोजित केली होती. यावेळी अजित कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून इफ्तार पार्टीला उपस्थित होते. यावेळी त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर तोफ डागली. मशिंदीवरील भोंगे काढण्यासाठी राज ठाकरेंनी स्वतः यावं त्यांचा ताफा मी अडवेन, असे खुल आवाहन मनसेच्या माजी पदाधिकऱ्याने राज ठाकरे यांना केले.
तुम्ही काय सीएम किंवा पीएम नाहीत -राज ठाकरे हे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नाहीत, त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश देण्यापेक्षा त्यांनी स्वतः मैदानात उतरावं, असे अजित कुलकर्णी यांनी म्हटले आहे. प्रहार संघटनेकडून हिंदू मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. जातीय सलोखा किंवा हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.