सोलापूर-कर्नाटक राज्यातील हिजाबच्या वादाचे पडसाद ( Hijab Controversy ) सोलापुरात उमटू लागले आहे. माजी आमदार नरसय्या आडम यांच्या ( Narasaya Adam march with women ) नेतृत्वाखाली शेकडो मुस्लिम महिलांनी मोर्चा काढला. सोलापुरात मोर्चा काढण्यास परवानगी नसतानाही शेकडो महिला सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर चालून आल्या.
हिजाब प्रकरणाचे तीव्र पडसाद सोलापुरात ( Karnatak Hijab Controversy impact in Solapur ) उमटू लागले आहेत. सर्वस्तरातून हिजाब बंदीचा विरोध केला जात आहे. गुरुवारी (10 फेब्रुवारी) रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने हिजाब परधान करून महिलांनी मोर्चा काढला. बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताबडतोब ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ( Police arrest protestors in Solapur ) सुरू केली आहे.
माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली महिलांचे आंदोलन
हेही वाचा-हिजाब संविधानाने दिलेला अधिकार... वंचित युवा आघाडीचे आंदोलन
हिजाब घालणे हा सांस्कृतिक अधिकार- माजी आमदार आडम-
मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब घालून शालेय किंवा महाविद्यालयातील वर्गात बसणे, हा त्यांचा धार्मिक अधिकार नव्हे तर सांस्कृतिक अधिकार आहे. भाजपशासित कर्नाटक राज्यात समाजात धार्मिक ध्रुवीकरण घडवून आणण्यासाठी विद्यार्थिनींवर हिजाब बंदी घातली जात आहे. भारतात विविध समाजात वेगवेगळ्या धार्मिक परंपरा आहेत. भारतीय नागरिक आपल्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जपू शकतात, असे माकप नेते व माजी आमदार आडम यांनी बोलताना माहिती दिली. कर्नाटक राज्य सरकारचा तीव्र निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली.
हेही वाचा-Hijab Controversy Case : हिजाब वादाची महाराष्ट्रातही ठिणगी; जाणून घ्या, काय आहे वाद ?
कर्नाटक सरकारने मुस्लिम विद्यार्थ्यांना सुरक्षा देणे गरजेचे-
कर्नाटक राज्यात काही धर्मांध व्यक्ती चिथावणीखोर आवाज देत मुस्लिम विद्यार्थिनींच्या अंगावर धावून जात आहेत. मुस्लिम विद्यार्थिनींना कर्नाटक राज्य सरकारने सुरक्षा द्यावी. जर राज्यकर्ता पक्षच तेथे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवत असेल तर ही चिंतेची बाब आहे, असेही आमदार आडम यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-Karnataka's hijab controversy : हिजाब प्रकरणावरून पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच जोरदार आंदोलन
हिंदुस्थानी भाऊकडून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची दिशाभूल-
लॉकडाऊनमुळे गोरगरिबांच्या शिक्षणात विघ्न आले आहे. त्यानंतर तथाकथित हिंदुस्थानी भाऊ या नावाच्या व्यक्तीने विद्यार्थ्यांना चिथावण्याचा प्रयत्न करून बहुजन वर्गातील विद्यार्थ्यांची दिशाभूल केली. महाराष्ट्र राज्यातील तरुणांची मने दूषित करणाऱ्यांच्या कारवाया शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात कदापि खपवून घेतले जाणार नाही, अशी भावना माजी आमदार नरसय्या आडम व मुस्लिम महिला आंदोलक अफसना शेख यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.