पंढरपूर ( सोलापूर ) : श्री विठ्ठल आश्रमात दुपारच्या जेवणामध्ये बासुंदी, पत्ता कोबी, बेसन, चपाती, भजीचा समावेश होता.संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आश्रमातील विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाब, पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने पंढरपूर येथील उपजिल्हा रूग्णालयांमध्ये सर्व बालकांना आणि पुरुषांना दाखल करण्यात आले. बाधितांपैकी दहा ते पंधराजणांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. पंढरपूरमध्ये नुकतीच आषाढी वारीचा सोहळा मोठ्या संख्येने संपन्न झाला. यात्रा कालावधीमध्ये भेसळीचे पदार्थ आढळून आले होते. तर औषध प्रशासनाने काही पेढे विक्रेत्यांवर कारवाई केली होती.
सर्वांची प्रकृती स्थिर -पंढरपूर येथील उपजिल्हा रूग्णालयात ( Upazila Hospital Pandharpur ) ३० ते ३२ विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले. जेवणानंतर आपण बासुंदी, पत्ताकोबी, बेसन, खाल्याने विषबाधा झाल्याचे रूग्णाकडून सांगण्यात आले आहे. तर सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती उपजिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद गिराम यांनी ( Upazila Medical Officer Dr Arvind Gira ) दिली आहे. विषबाधा झालेले सर्व विद्यार्थी हे श्री विठ्ठल आश्रमामध्ये धार्मिक शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये काही स्थानिक तर काही वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थी आहेत.