सोलापूर- शहर आणि परिसरात रासायनिक ताडीची विक्री होत असल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासन कार्यालय प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने आज गुरुवारी अन्न प्रशासन विभागाच्या वतीने पाच ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे. या ठिकाणी रासायनिक पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. येथील ताडीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत, तसेच रासायनिक विक्रीची पाच दुकाने सील करण्यात आली आहेत. यामध्ये पाच आरोपींवर कारवाई करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.
सोलापुरातील आकाशवाणी रोडवरील नीलम नगर येथील सत्यभामा सुभाष कोकडा यांच्याकडून 298 लीटर ताडी व तीन किलो क्लोराईडसाठा जप्त करण्यात आला आहे. रविवार पेठेतील जय हॉस्पिटलच्या मागे असलेल्या कौशल्य मारुती गुजराती यांच्याकडून 283 लिटर ताडी जप्त करण्यात आली आहे. तर विडी घरकुल येथील गोल्डन ड्रिंक्स मालक राम कनकय्या भंडारी यांच्याकडून आठ किलो पांढरी रासायनिक पावडर जप्त करण्यात आली आहे. तसेच जोडभावी पेठ येथील विठ्ठल भंडारे यांच्याकडून तयार ताडीचे 567 पिशव्या आणि 283 लिटर ताडी जप्त करण्यात आली आहे. रविवार पेठेतील वडार गल्ली येथील तिमक्का मंजुळे यांच्या घरातून ताडीचा नमुना सर्वेक्षणसाठी किंवा तपासणीसाठी घेण्यात आला आहे.
महिला कॉन्स्टेबलला सोबत घेऊन कारवाई-