सोलापूर - मराठा आरक्षण विरोधातील याचिकेच्या निकालाविरोधात ना पसंती दर्शवत अनेक वृत्त वाहिन्यांमधून कार्यक्रमात न्यायाधीश रणजित मोरे ( Judge Ranjit More ) यांच्यावर मराठा जातीचे ( Maratha caste ) आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( EX Chief Minister Devendra Fadnavis ) आणि उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे ( Former Higher Education Minister Vinod Tawde ) यांनी न्यायाधीशावर दबाव टाकून निकाल लावून घेतल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते ( Gunaratna Sadavarte ) यांनी केला होता. मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह भाषा ( Offensive language about Maratha community ) वापरून मराठा जाती विरोधात खुल्या व ओबीसी प्रवर्गातील जातींना भडकवण्यासाठी प्रयत्न केला असल्याचा आरोप करत राष्ट्रीय छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार ( Vice President of Chhawa Association Yogesh Pawar ) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सदावर्तें विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Gunaratna Sadavarte Solapur : मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूरनंतर आता सोलापुरातही सदावर्तेंवर गुन्हा दाखल
न्यायाधीशावर दबाव टाकून निकाल लावून घेतल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते ( Gunaratna Sadavarte ) यांनी केला होता. मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह भाषा ( Offensive language about Maratha community ) वापरून मराठा जाती विरोधात खुल्या व ओबीसी प्रवर्गातील जातींना भडकवण्यासाठी प्रयत्न केला असल्याचा आरोप करत राष्ट्रीय छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार ( Vice President of Chhawa Association Yogesh Pawar ) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सदावर्तें विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
न्यायाधीशांची जात काढून आक्षेपार्ह वक्तव्य :गुणवंत सदावर्ते यांनी 27 जून 2019 रोजी एका खासगी वृत्त वाहिनीच्या एका कार्यक्रमात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रणजित मोरे व न्यायाधीश भारती डोंगरे यांनी दिलेल्या निकालाविरोधात नापसंती दर्शवली. तसेच त्यांच्या निर्णयावर शंका घेत निकाल देणारे रणजित मोरे हे मराठा जातीचे आहेत, असे म्हणून त्यांची जात काढून मराठे हे शूद्र आहेत, अशी भाषा सदावर्तेंनी वापरली. मोरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांचे ऐकून त्यांच्या दबावाखाली मराठा समाजाच्या बाजूने निकाल दिला आहे, असे जाणीवपूर्वक वक्तव्य केल्याचे योगेश पवारांनी सांगितले आहे. योगेश पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, आम्ही गुन्हा दाखल करून घेतला आहे. लीगल प्रक्रिया सुरू केली आहे.