महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सोलापूर विमानतळातील गवताला भीषण आग

होटगी रोड येथील विमानतळ धावपट्टीच्या बाजूला मोठे गवत आहे. सध्या उन्हाळा असल्याने हे गवत पूर्णपणे वाळलेले आहे. अज्ञात कारणाने गवताळ भागात ठिणगी पडली. या ठिणगीचे रूपांतर मोठ्या आगीत झाले.

विमानतळ परिसरात लागलेली आग
विमानतळ परिसरात लागलेली आग

By

Published : Apr 20, 2021, 5:28 PM IST

सोलापूर- होटगी रोड येथील विमानतळ परिसरात असलेल्या गवताला सोमवरी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. विमानतळ परिसरात दुसऱ्यांदा आग लागली आहे. याअगोदर दोन वर्षांपूर्वीही आग लागली होती. अग्निशामक दलाने सोमवारी रात्री 8 बंब गाड्या पाण्याचा फवारा मारून ही आग आटोक्यात आणली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

सोलापूर विमानतळातील गवताला भीषण आग

दीड ते दोन एकर गवत जळून राख

होटगी रोड येथील विमानतळ धावपट्टीच्या बाजूला मोठे गवत आहे. सध्या उन्हाळा असल्याने हे गवत पूर्णपणे वाळलेले आहे. अज्ञात कारणाने गवताळ भागात ठिणगी पडली. या ठिणगीचे रूपांतर मोठ्या आगीत झाले. विमानतळाशेजारी असलेल्या लोकवस्तीमध्ये आगीचे लोण पसरल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते.


8 बंब पाण्याचा फवारा मारून आग विझविण्यात आली

विमानतळ परिसरात मोठी आग लागली असल्याची माहिती अग्निशामक दलाला 11.30च्या सुमारास मिळाली होती. माहिती मिळताच ताबडतोब अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पाण्याचा फवारा मारून रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही आग आटोक्यात आणली, अशी माहिती अग्निशामक दल अधिकारी केदार आवटे यांनी दिली आहे.

हेही वाचा -केंद्राकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचे सीरमकडून स्वागत

ABOUT THE AUTHOR

...view details