महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मार्केट यार्डात कांदा चोरीमुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला

मार्केट यार्डात सोमवारी सकाळी विविध तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला. बाजारसमितीत भुरट्या चोरांमार्फत मोठ्या प्रमाणात कांदा चोरी होत आहे. त्याला वैतागून आज सोलापूर मार्केट यार्डात लिलाव बंद करण्यात आला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती
मार्केट यार्डात कांदा चोरीमुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला

By

Published : Dec 14, 2020, 12:48 PM IST

सोलापूर - मार्केट यार्डात सोमवारी सकाळी विविध तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला. बाजारसमितीत भुरट्या चोरांमार्फत मोठ्या प्रमाणात कांदा चोरी होत आहे. त्याला वैतागून आज सोलापूर मार्केट यार्डात लिलाव बंद करण्यात आला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

मार्केट यार्डात कांदा चोरीमुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला

भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी

सोलापूर मार्केट यार्डात जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून शेतकरी कांदे तसेच अन्य अन्नधान्य लिलावासाठी घेऊन येतात. परंतु, मार्केट यार्डातील भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला होता. पहाटेच्या सुमारास हे भुरटे चोर कांदा चोरी करत होते. शेवटी आज सोमवार एपीएमसीमध्ये आलेल्या शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद करून चोरट्यापासून संरक्षणाची मागणी केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनात सहभागी होत लिलाव बंद केला

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांना संबंधित माहिती मिळताच त्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेत आंदोलनात सहभाग घेतला. तसेच संबंधित चोरट्यांवर कारवाईची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे केली. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मालावर डल्ला मारणारे चोर मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

ABOUT THE AUTHOR

...view details