महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सोलापूरमध्ये झाला सर्वात महागडा म्हशींचा व्यवहार; इतक्या किमतीला घेतली म्हैस - madha buffalo

माढा तालुक्यातील गार अकोले गावातील शिवाजी कैचै या शेतकऱ्याकडून सचिनने ही म्हैस खरेदी केली आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून सचिन शिवाजी कैचे यांच्याकडे म्हैस विकत घेण्याची मागणी करीत होते. मागील १५ दिवसांपुर्वी सचिनने ही म्हैस विकत घेतली आहे.

solapur
सर्वात महागडा म्हशींचा व्यवहार

By

Published : Aug 16, 2021, 10:26 AM IST

माढा(सोलापुर) - एखाद्या म्हशीची किंमत किती असु शकते ४० हजार,५० हजार फार फार तर एक लाख. मात्र, माढ्यातल्या सचिन करळे या युवा शेतकऱ्याने ३ लाख ५१ हजार रुपये मोजून म्हैस खरेदी केली आहे. हा म्हशीचा शौकिन शेतकरी इतर १० म्हशीचा देखील सांभाळ करत आहे.जनावरांच्या बाजारातील हा एवढा मोठा व्यवहार कसा काय याबद्दल तुम्ही आश्चर्यचकीत झाले असाल. माढ्यातील म्हशीचा झालेला हा तगडा व्यवहार चांगलाच चर्चेत आलाय.

सर्वात महागडा म्हशींचा व्यवहार

शेतीतल्या नुकसानीने त्रस्त झालेल्या नैराश्यात असलेल्या माढ्यासह परिसरातील शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणुन दुग्ध व्यवसाय करण्यासंदर्भात मार्गदर्शन आणि सल्ला देण्याचे काम सचिन करतोय. सध्याच्या घडीला १० म्हशींचा सांभाळ सचिन करीत असून दिवसाकाठी ८० लिटर दुधाचे संकलन करत आहे. करळे यांनी दुग्ध व्यवसायातून समृध्दी मिळवली असून सचिनला लहानपणापासून म्हशी खरेदी आणि तो सांभाळण्याचा छंद जडला आहे.

3 लाख रुपयांना खरेदी केली म्हैस

माढा तालुक्यातील गार अकोले गावातील शिवाजी कैचै या शेतकऱ्याकडून सचिनने ही म्हैस खरेदी केली आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून सचिन शिवाजी कैचे यांच्याकडे म्हैस विकत घेण्याची मागणी करीत होते. मागील १५ दिवसांपुर्वी सचिनने ही म्हैस विकत घेतली आहे.

आमदारांना आवडली गाय
दिवसाला २० ते २५ लिटर दुध देणाऱ्या या म्हशीची बातच कुछ न्यारी हैं..तब्बल ९०० किलो वजनाची एखाद्या छोट्याश्या हत्ती सारखी दिसणारी ही म्हैस माढ्यासह पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरली आहे.सोलापुरसह संपूर्ण म्हशी प्रेमी शेतकरी ही म्हैस पाहण्यासाठी आवर्जून येत आहेत. करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांना ही म्हैस आवडली असुन त्यांनी ही म्हैस करळे यांना मागितली आहे.मात्र करळे यांनी आताच म्हैस विकण्याचा निर्णय नसल्याचे सांगितलाय. काय आहेत या म्हशीची वैशिष्ट्य-तब्बल ९०० किलो वजन,२० ते २५ दोन वेळेसचे दुध,मालकाला ओळखण्याचा खास गुण,रुबाबदार हत्ती च्या पिल्ला समान शरीर यष्टी यासह अन्य वैशिष्ट्य या म्हशीची आहेत.इतकी महागडी म्हैस आणल्याचा आनंद तर करळे यांनी फटाके फोडत,गुलालाची उधळण साजरा केला. तर महिलांनी औक्षण करुन तिला पेढा भरवत आनंद साजरा केलाय. आमच्यासाठी ही म्हैस म्हणजे भाग्यलक्ष्मीच असल्याच्या भावना करळे कुटुंबातील महिलांनी व्यक्त केल्या. एकत्रित पद्धतिने काम केले तर कुटूबांची प्रगती कशी होते हे माढ्यातील करळे कुटुंबाने दाखवून दिले आहे.

माढ्यातील म्हैस खासच
म्हशीचे अनेक प्रकार आहेत.त्या पैकी एक असलेली पंढरपुरी गवळाऊ म्हैस ६० ते जास्तीत १ लाखा पर्यत असतात.आणि तिचे वजन ३०० ते ४५० किलो पर्यत असु शकते.योग्य नियोजनानुसार केलेले पालन पोषण आणखी फायदेशीर ठरू शकते.माढ्यातील म्हैस ९०० किलो असल्याचे समजले आहे.
- डाॅ.विक्रांत बागल तालुका पशुवैद्यकीय अधिकारी

म्हैस ही लक्ष्मीच
दुधाला भाव जरी मिळत नसला तरीही, तो अपेक्षित उत्पन्न शेतीतून मिळवू शकतो. मला म्हैस सांभाळण्याचा छंद जडला आहे. ही ९०० किलोची म्हैस खरेदी करण्यासाठी मी म्हशीच्या मालकाकडे अनेक वर्ष मागणी करत होतो. आज माझ्या गोठ्यात १० म्हैस आहेत, असेही सचिनने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details