महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Exam Fever 2022 : सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षांबाबत मोठी बातमी; जाणून घ्या कशी होणार परीक्षा - सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा

Exam Fever 2022 : सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा देखील ऑनलाइन आणि ऑफलाईन ( solapur university exam online and Offline ) घेण्यात येणार आहे. पण परीक्षा बाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, मिश्र प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे. काही विद्यार्थी म्हणतात की, परीक्षा या ऑनलाइनच घ्या तर काही विद्यार्थी म्हणतात गुणवत्ता टिकवण्यासाठी ऑफलाईन परीक्षा आवश्यक आहे.

Exam Fever 2022
सोलापूर विद्यापीठ

By

Published : Apr 23, 2022, 5:26 PM IST

Updated : Apr 26, 2022, 6:51 PM IST

Exam Fever 2022: सोलापूर- कोरोना महामारी सुरू झाल्यापासून अनेक बदल पहावयास मिळाले. फक्त सोलापूर जिल्ह्यासाठी असलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने देखील विद्यापीठीय परीक्षा दोन वर्षांपासून ऑनलाइन घेतल्या. यंदा मात्र कोरोना महामारीचा संसर्ग व तीव्रता कमी झाल्याने निर्बंध शिथिल होत आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा देखील ऑनलाइन आणि ऑफलाईन घेण्यात ( solapur university exam online and Offline ) येणार आहे. पण परीक्षा बाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, मिश्र प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे. काही विद्यार्थी म्हणतात की, परीक्षा या ऑनलाइनच घ्या तर काही विद्यार्थी म्हणतात गुणवत्ता टिकवण्यासाठी ऑफलाईन परीक्षा आवश्यक आहे. विद्यापीठ परीक्षा प्रमुख यांनी माहिती देताना सांगितले की, यंदा ब्लेंडेड म्हणजेच मिश्र (ऑनलाइन आणि ऑफलाईन) परीक्षा घेण्याचे प्रयत्न विद्यापीठ प्रशासन करत आहे.

प्रतिक्रिया

25 मे 2022 पासून सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा सुरू -कोरोना महामारी नंतर सोलापुरातील सर्व सार्वजनिक सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम मुक्त वातावरणात संपन्न होत आहेत. सोलापुरातील अनेक महाविद्यालयात रेग्युलर तास होत आहेत. महाविद्यालयात दररोज येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील वाढली आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा या ऑनलाइन झाल्या होत्या. यंदा मात्र 25 मे पासून परीक्षा या फक्त ऑनलाइन नव्हे तर ऑफलाईन देखील होणार आहेत. सोलापूर विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रोफेशनल आणि नॉन प्रोफेशनल कोर्सेसच्या परीक्षा मिश्र पद्धतीने होणार आहेत.

अशा पद्धतीने होणार परीक्षा -पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत होणाऱ्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा मिश्र पद्धतीने होणार आहेत. जे विद्यार्थी मार्च एप्रिल दरम्यान फायनल इअर किंवा फायनल सेमिस्टर परीक्षा देणार आहेत त्या सर्व परीक्षा ऑफलाईन होणार आहेत. जे विद्यार्थी फ्रेशर आहेत त्यांच्या 2, 4, 8 आणि 10 च्या सेमेस्टर परीक्षा देणार आहेत, त्या विद्यार्थ्यांचे एक कम्पलसरी पेपर ऑफलाईन होणार आहे तर बाकीचे सर्व परीक्षा पेपर ऑनलाइन होणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या मिश्र प्रतिक्रिया -पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लास, ऑनलाइन परीक्षा याची सवय लागली आहे. याबाबत ईटीव्ही भारतने विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता मिश्र परीक्षा पध्दती प्रमाणे मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी माहिती देताना सांगितले की, दोन वर्षांपासून ऑनलाइन परीक्षा देण्याची सवय झाली आहे. त्यामुळे आता दोन ते तीन तास बसून लिखाण करून परीक्षा देता येतील का हा आत्मविश्वास राहिला नाही.परंतु काही विद्यार्थ्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, ऑनलाइन परिक्षांमुळे गुणवत्ता राहिली नाही. विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता टिकवायची असेल तर ऑफलाईन परीक्षा देणे गरजेचे आहे.

हेही वाचा -Exam Fever 2022 : पाचवी-आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २० जुलैला; नोंदणी अर्जाकरीता मुदत वाढ!

Last Updated : Apr 26, 2022, 6:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details