सोलापूर - विवाहित महिलांवर सासरच्या लोकांकडून छळ होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. सदर बजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 लाख व 5 तोळे सोन्यासाठी विवाहित महिलेचा छळ झाला असून अखेर या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
धनश्री स्वप्नील गुडुर(वय 21) या विवाहितेने सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पती स्वप्नील नागेश गुडुर, सासू गीता नागेश गुडुर, सासरे नागेश गुडुर यांविरोधात भादंवि 498-अ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
धनश्रीचा विवाह 29 नोव्हेंबर 2017 रोजी स्वप्नील गुडुर यासोबत झाला होता. लग्नाच्या सहा महिन्यांनंतर धनश्रीला सासरच्या लोकांनी पैशाचा तगादा लावला. माहेरुन 2 लाख रुपये आणि 5 तोळे सोने घेऊन ये, अशी मागणी पती, सासू व सासरे यांनी करायला सुरुवात केली. सतत मानसिक व शारीरिक त्रास देत ही मागणी देखील वाढली. कमीतकमी दीड लाख तरी घेऊन ये, असा तगादा लावण्यात आला.