महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Dnyaneshwar Maulis palakhi : सातारा जिल्ह्याचा पाहुणचार घेऊन ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश - Superintendent of Police Tejaswi Satpute

आळंदीहून (Alandi) निघालेला संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी (Shri Dnyaneshwar Maharaj Palkhi) सोहळा सातारा (Satara)जिल्ह्यातील सहा दिवसांचा मुक्काम संपवून फलटण (Phaltan), बरडकरांचा पाहुणचार घेऊन लवाजम्यासह सोलापूर जिल्ह्याकडे मार्गस्थ. पालखी सोहळ्याने सोलापूर जिल्ह्यात धर्मपूरी येथे प्रवेश केला त्यावेऴी सोलापूरकरांनी पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत केले.

Santshrestha Sri Dnyaneshwar
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर

By

Published : Jul 5, 2022, 11:12 AM IST

सातारा - संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी (Shri Dnyaneshwar Maharaj Palkhi)सोहळा सोलापूर जिल्हात( Solapur district )दाखल,यावेऴी सोलापूरकरांनी पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले. माऊलींच्या पालखी सोहळ्यासमवेत रथापुढे 27 दिंड्या तर रथामागे जवळपास 400 दिंड्या आहेत. त्याचबरोबर वारीमध्ये चार ते साडेचार लाख वारकरी (Warakari )सहभागी झाले आहेत. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे 28 जून ते 4 जुलै दरम्यान सातारा जिल्ह्यातील लोणंद, तरडगाव, फलटण व बरड येथे मुक्काम होते. या दरम्यान चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण पार पडलेआणि सातारा (Satara) जिल्ह्यात पालखीचे भव्य स्वागत केले . सहा दिवसांच्या मुक्कामात सातारा जिल्ह्यात माऊलींच्या सोहळ्याचा भाविकांनी पाहुणचार केला. प्रशासनाने देखील सर्व त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या .

दोन हजार शौचालये, 43 पाणी पुरवठा केंद्रांची सोय-संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांच्या सोयीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने दोन हजार शौचालये, 43 पाणी पुरवठा केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्याच बरोबर राष्ट्रीय रस्ते महामार्ग विकास मंडळाच्या (National Roads Highways Development Board ) माध्यमातून धर्मपुरी ते वाखरी या सुमारे 75 कि. मी. रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. पालखी सोहळ्यातील तळाच्या आणि रिंगणाच्या जागांचे मुरमीकरण करण्यात आले आहे. आरोग्य, पाणी पुरवठ्याची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.


सातारा प्रशासनाने पालखी सोहळ्याचा घेतला निरोप-सातारा जिल्ह्यातील मुक्काम संपवून पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवर पोहोचल्यानंतर सातार्‍याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख यांनी पालखी सोहळ्याचा जड अंत:करणाने निरोप घेतला. यावेळी सर्वच प्रशासकीय अधिकारी टाळ-मृदंगासह वारीत सहभागी झाले. सोलापूर हद्दीवर शेखर सिंह यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्याकडे पालखी सोहळ्याची सूत्रे सोपवली. त्यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Ceo Dilip Swami), सोलापूरच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते (Superintendent of Police Tejaswi Satpute) उपस्थित होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details