सोलापूर -सोलापूर शहरातील महावीर चौकात वाहनधारकाने महिला पोलिसासोबत असभ्यवर्तन केले ( Disrespectful Behavior Female Traffic Police ) आहे. चुकीच्या दिशेने जात असताना महिला पोलिसाने वाहतूकदारास रोखले असता तरुणाने हुज्जत घालून मोठा गोंधळ केला. पोलीस आयुक्तालय जवळच असल्याने महावीर चौकात आरसीपीचे जवान ताबडतोब दाखल झाले. याप्रकरणी तरुणावर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु ( Solapur Police Register Fir Driver ) आहे.
तक्रार दाखल करण्याचे काम सुरु
सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ( Sadar Bajar Police Station Solapur ) ही घटना घडली असल्याने पोलिसांनी तरुणास ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यावर सरकारी कामात अडथळा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी सांगितली आहे.