सोलापूर -कोरोना संसर्गजन्य विषाणूचा फैलाव अजून संपलेला नाही. दररोज नव्याने रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिन साधेपणाने साजरे करा आणि नवरात्र काळात रुपा भवानी मंदिर दर्शनासाठी खुले केले जाणार नाही. बंदच राहणार असल्याची माहिती डीसीपी डॉ. वैशाली कडुकर व डीसीपी बापू बांगर यांनी दिली.
'कोरोना महामारी अजून संपलेली नाही' धम्मचक्र साधेपणाने तर रुपाभवानी मंदिर दर्शनासाठी बंदच - सोलापूर डीसीपी डॉ. वैशाली कडुकर बातमी
नवरात्र महोत्सव काळात भाविक रुपा भवानी मंदिरात दर्शनासाठी येतात. परंतु यंदा हे मंदिर दर्शनासाठी खुले राहणार नाही. भाविकांनी घरी राहूनच आराधना, प्रार्थना करावी. जेणेकरून कोरोना आजाराचा फैलाव रोखता येईल, अशा सूचना देत ही बैठक संपन्न झाली. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या व नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी बैठकीस सर्व पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
धम्मचक्र प्रवर्तन दिन व नवरात्र महोत्सव निमित्त सोलापूर पोलीस आयुक्तालयात नवरात्र महोत्सव मंडळ व धम्मचक्र प्रवर्तन मंडळ यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कोरोना महामारी कशी रोखता येईल व गर्दी होता कामा नये, यावर चर्चा झाली. धम्मचक्र प्रवर्तन दिन साधेपणाने साजरा करा, कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढता येणार नाही, तसेच समता सैनिक दलाची मानवंदनेला परवानगी नाकारण्यात आली. बौद्ध बांधवांनी घरी राहूनच धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करा, सार्वजनिक ठिकाणी जमा होऊन गर्दी करू नका, अशा सूचना पोलीस आयुक्तालयाच्या वतीने देण्यात आल्या.