सोलापूर : राम मंदिरात पाच हजार दिवे लावून देव दीपावली साजरी - श्रीराम मंदिर सोलापूर
कार्तिक पौर्णिमेचा सण म्हणजे देव दीपावली होय. संपूर्ण उत्तर भारतात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. जगातील सर्वात प्राचीन शहर काशी येथील परंपरा आहे. सोलापूर शहरातील राम मंदिरात ही परंपरा जपली जात आहे. दिवाळी झाल्यानंतर पंधरा दिवसांनी देव दीपावली साजरी केली जाते. सोमवारी सोलापूर शहरात नागरिकांनी देव दीपावली साजरी केली.
सोलापूर- दरवर्षी प्रमाणे यंदा ही कार्तिकी पौर्णिमेला सोलापूर शहरातील राम मंदिर पाच हजार दिव्यांनी उजळून गेले होते. हजारो भाविकांनी भगवान श्री रामाचे दर्शन घेतले आणि राम मंदिरात दिवे लावले. या दिव्यांनी राम मंदिरात रोषणाई झाली होती. दरवर्षी कार्तिकी पौर्णिमेला देव दीपावली साजरी केली जाते.
देव दीपावली..