सोलापूर - निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी पुणे येथे एल्गार परिषद भरवण्यासाठी परवानगी मागितली आहे. त्यासाठी स्वारगेट पोलीस स्टेशन येथे एल्गार परिषदेने परवानगी अर्ज केला आहे. त्यावर भाष्य करताना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, परवानगी द्यावी की नाही, हे राज्य सरकार ठरवेल. शंभूराज देसाई आज सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत एल्गार परिषदेविषयी माहिती दिली.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई कोविड नियमावलीत समूह एकत्र होणे किंवा तसे कार्यक्रम घेणे मनाई-
कोविड नियमावलीत समूह एकत्र करणे किंवा तसे कार्यक्रम घेणे याला मनाई आहे, असे शंभूराज म्हणाले. ब्रिटन देशात कोरोना विषाणूचा नवा प्रकार समोर आला आहे. त्याचा अधिक वेगाने प्रसार होत आहे. त्यामुळे कोणत्याही सामूहिक कार्यक्रमांना परवानगी मिळत नाही. तसेच एल्गार परिषदेला परवानगी द्यायची का नाही हे राज्य सरकार ठरवेल, असे गृहराज्यमंत्री यांनी सांगितले.
2017 मध्ये पुण्यात झाली होती एल्गार परिषद
पुण्यात 2017 मध्ये एल्गार परिषद भरवण्यात आली होती. यावर मोठे वादंग निर्माण झाले होते. येत्या 31 डिसेंबरला पून्हा पुण्यात एल्गार परिषद भरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी स्वारगेट पोलीस स्टेशन येथे निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी अर्ज केला आहे. निवृत्त शासकीय अधिकारी आणि कार्यकर्ते यांनी एकत्रित येत साने गुरुजी स्मारकाच्या आवारात बैठक घेण्यात आली होती.
यापूर्वी एल्गार परिषदेनंतर कोरेगाव भीमा येथे हिंसाचार-
31 डिसेंबर 2017 मध्ये एल्गार परिषद शनिवार वाड्यात घेण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोरेगाव भीमा येथे मोठा हिंसाचार झाला होता. या हिंसाचाराच्या घटनेला एल्गार परिषद कारणीभूत असल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली होती. 2017 च्या एल्गार परिषदेनंतर झालेला हिंसाचार पाहून यंदाची एल्गार परिषद रद्द होते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा -पाषाण तलावाजवळ आढळलेला 'गवा' पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू.. परिस्थिती नियंत्रणात