सोलापूर- माकपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज क्रांती दिनी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव आंदोलन करत असताना पोलिसांनी विरोध करत आडम मास्तर यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव... माकप नेते आडम मास्तर पोलिसांच्या ताब्यात
क्रांती दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर घेराव आंदोलन पुकारले होते. लॉकडाऊनच्या काळात कामगारांना प्रति महिना 10 हजार रुपये अनुदान द्यावे, तसेच लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल सरसकट माफ करावे, यासह अनेक मागण्यांसाठी केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समिती व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन्सच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर घेराव आंदोलन पुकारले होते
क्रांती दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर घेराव आंदोलन पुकारले होते. लॉकडाऊनच्या काळात कामगारांना प्रति महिना 10 हजार रुपये अनुदान द्यावे, तसेच लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल सरसकट माफ करावे, यासह अनेक मागण्यांसाठी केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समिती व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन्सच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर घेराव आंदोलन पुकारले होते. यासाठी नरसय्या आडम मास्तर हे त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयावर येत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आडम मास्तर यांच्यासह आंदोलनासाठी आलेल्या कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
लॉकडाऊनच्या काळात कामगारांचे खूप मोठे हाल झालेले आहेत. अनेकांचा रोजगार हिरावून गेला होता. लॉक डाऊनच्या काळात कामगारांना प्रति महिना 10 हजार रुपये प्रति महिना अनुदान द्यावे यासाठी कामगारांच्या वतीने 1 लाख अर्ज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. एक महिन्यापूर्वी हे 1 लाख अर्ज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. त्यावेळीच लवकर अनुदान मिळाले नाही तर 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आज माजी आमदार आडम मास्तर यांनी कामगारांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर घेराव घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. सर्वांना सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे.